-
प्रयागराजमधील १२ वर्षांनतर आलेला महाकुंभमेळा हा सुरु झाल्यापासून विविध कारणांनी चर्चेत आला आहे. काल १७ फेब्रुवारीला पुन्हा एकदा प्रयागराजमध्ये आगीचं सत्र पाहायला मिळालं. याशिवाय दुर्दैवी चेंगराचेंगरीमुळे अनेकांना त्यांचा जीवही गमवावा लागला होता. चला जाणून घेऊयात महाकुंभमेळ्यात आतापर्यंत घडलेल्या अपघातांच्या घटनांबद्दल.. (Photo: PTI)
-
काल १७ फेब्रुवारीला एका कॅम्पमध्ये (तात्पुरते गाव) आग लागली आणि तिथे पुन्हा एकदा फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या आणि अनेकांना वाचवण्यात आले. यानिमित्ताने तिथे सोईसुंविधांबाबत आणि सुरक्षेबद्दल प्रशासन मोठ्या प्रमाणात अपयशी होतयं का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Photo: Social Media)
-
पहिली आगीची घटना घडली १९ जानेवारी २०२५ रोजी. ही आग सेक्टर १९ मध्ये लागली होती. त्यामागचं कारण होतं गॅस सिलेंडरचा स्फोट. दुसरी आग २५ जानेवारी रोजी लागली होती. ही आग दोन वाहनांना लागली होती.
-
त्यानंतर अशा दुर्घटनांचं एक सत्रच पाहायला मिळालं. ७ फेब्रुवारी- सेक्टर १८, ९ फेब्रुवारी- सेक्टर २३, १३ फेब्रुवारी- सेक्टर १८, १५ फेब्रुवारी- सेक्टर १९, १७ फेब्रुवारी- सेक्टर ८ या ठिकांणावर आगीच्या घटना दुर्घटना घडल्या. (फोटो: रॉयटर्स)
-
महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या दरम्यान चेंगराचेंगरी घटना घडली होती. (फोटो: रॉयटर्स)
-
त्या घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला होता तर ६० जण जखमी झाल्याचीही घटना घडली होती. (फोटो: रॉयटर्स)
-
तसेच काही दिवसांपूर्वी अख्ख प्रयागराज शहर ट्रॅफिकमध्ये अडकलं होतं. (PTI Photo)
-
भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्याने शहरातील रस्त्यांवर तासनतास वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या होत्या. (PTI Photo)
-
याशिवाय १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला होता आणि डझनभर लोक जखमी झाले होते. रेल्वे स्थानकावर जमलेली गर्दी प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जात होती. (एक्सप्रेस फोटो – गजेंद्र यादव)
VIDEO: बापरे भयंकर अपघात! वाशीमध्ये भर रस्त्यात ट्रकचा टायर फुटला अन् होत्याचं नव्हतं झालं; रिक्षाची अवस्था बघून घाम फुटेल