-
काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी आज (१८ फेब्रुवारी) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा (Maharashtra Pradesh Congress Committee President) पदभार स्वीकारला.
-
हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात.
-
हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी तळागाळातून पुढे आली आहे.
-
१९९९ ते २००२ या काळात हर्षवर्धन सपकाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते.
-
महाराष्ट्रातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांचा त्यावेळी लौकिक होता.
-
हर्षवर्धन सपकाळ हे २०१४ ते २०१९ पर्यंत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.
-
हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
-
गेल्या काही काळात हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षासाठी राष्ट्रीय स्तरावरही काम केले असून, अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षासाठी विविध भूमिका पार पाडल्या आहेत.
-
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांनी नियुक्ती केली आहे.
-
हर्षवर्धन सपकाळ यांना राज्यभर दौरे करून पक्षाचे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार करावे लागेल.
-
सपकाळ आर्थिकदृष्ट्या प्रबळ अशा कोणत्याही सहकारी संस्थांशी संबंधित नाहीत.
-
यामुळेच महायुती सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या उद्देशानेच सपकाळ यांच्या नावाला पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पसंती दिली आहे. (सर्व फोटो – संखदीप बॅनर्जी, इंडियन एक्सप्रेस)
शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?