-
देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीत सत्ता कोणाकडे असेल हे आता निश्चित झाले आहे. भारतीय जनता पार्टीने दिल्लीची सत्ता रेखा गुप्ता यांच्याकडे हाती सोपवली आहे. (Express Photo : Gajendra Yadav)
-
होय, आता रेखा गुप्ता दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपाने ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद आणि ओम प्रकाश धनकर यांची नियुक्ती केली होती. रेखा गुप्ता या शालीमार बाग मतदारसंघाच्या आमदार आहेत. (Express Photo : Gajendra Yadav)
-
विधानसभा निवडणुकीत भाजपाने आम आदमी पार्टीचा पराभव करून मोठा विजय मिळवला आणि २७ वर्षांनी पक्ष पुन्हा सत्तेत आला. ७० जागांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४८ जागांवर विजय मिळाला तर आप ला २२ जागांवरच समाधान मानावे लागलं. (Express Photo : Gajendra Yadav)
-
दरम्यान, रेखा गुप्ता यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्या शालीमार बाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला. (Express Photo : Gajendra Yadav)
-
रेखा गुप्ता लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) सक्रिय सदस्य आहेत. संघाच्या विद्यार्थी संघटनेच्या म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) माध्यमातून त्यांनी विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला. १९९४-९५ मध्ये त्या दौलत राम कॉलेजच्या सचिव म्हणून निवडल्या गेल्या. (Express Photo : Gajendra Yadav)
-
१९९५-९६ मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (DUSU) सचिव झाल्या. १९९६-९७ मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष झाल्या. (Express Photo : Gajendra Yadav)
-
रेखा गुप्ता हरियाणातील जुलाना येथील आहेत पण जेव्हा त्या दोन वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांची दिल्लीला बदली झाली आणि त्यानंतर त्यांचे कुटुंब तिथेच स्थायिक झाले. (Express Photo : Gajendra Yadav)
-
रेखा गुप्ता यांचे वडील जय भगवान हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक होते. त्यांच्या आईचे नाव उर्मिला जिंदाल आहे त्या गृहिणी होत्या. (Express Photo : Gajendra Yadav)
-
रेखा गुप्ता यांचे पती मनीष गुप्ता हे स्पेअर पार्ट्सचे व्यापारी आहेत. (Express Photo : Gajendra Yadav)
-
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या दोन मुलांच्या आई आहेत. त्यांच्या मुलाचे नाव निकुंज गुप्ता आणि मुलगी हर्षिता गुप्ता आहे. हेही पाहा-अरविंद केजरीवालांना पराभूत करणारे परवेश वर्मा मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या मंत्रिमंडळात, पार पडला शपथविधी सोहळा!

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?