-
आज दिल्लीमध्ये रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
दिल्लीचे उप राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.
-
दिल्लीच्या शालिमार बाग मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेल्या भाजपाच्या रेखा गुप्ता यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे.
-
या शपथविधीला सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री व भाजपशासित राज्यातील मंत्री उपस्थित राहिले होते.
-
दरम्यान, रेखा गुप्ता यांच्यासह एकूण सहा आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
परवेश वर्मा, नवी दिल्ली
परवेश वर्मा यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. परवेश यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभव केला आहे. -
आशिष सूद
आशिष सूद हे जनकपुरी मतदारसंघाचे आमदार आहेत. आता त्यांना मंत्रिपद मिळालं आहे. -
मनजिंदर सिंग सिरसा
मनजिंदर राजौरी गार्डनर मतदारसंघाचे नेतृत्व करतात. आता त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. -
रविंद्र कुमार इंद्रज
बवानाचे आमदार रविंद्र यांनी आजच्या शपथविधीसोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. -
कपिल मिश्रा
करवाल नगर मतदारसंघाचे आमदार कपिल मिश्रा आता मंत्रि झाले आहेत. -
पंकज कुमार सिंग
विकासपुरीमधील आमदार पंकज कुमार सिंग यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. -
दरम्यान, हा शपथविधी सोहळा दिल्लीतील रामलीला मैदानावर पार पडला.
-
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांची या सोहळ्याला उपस्थिती होती.
-
(सर्व फोटो साभार- एनआय यूट्यूब चॅनेल)

२१ फेब्रुवारी राशिभविष्य: अनुराधा नक्षत्रात हातातील कामांना मिळेल यश तर कोणाला लाभेल जोडीदाराचा सहवास; वाचा तुमचा शुक्रवार कसा जाणार