-
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या त्यांच्या गृहराज्य गुजरातच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांचा तिसरा दिवस आहे. त्यांचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात ते जंगल सफारीचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. (छायाचित्र: पीटीआय)
-
सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त जुनागड जिल्ह्यातील गीर वन्यजीव अभयारण्यात जंगल सफारीचा आनंद घेतला. (छायाचित्र: पीटीआय)
-
जंगल सफारी दरम्यान पंतप्रधान मोदी वेगळ्याच अंदाजात दिसले. डोक्यावर टोपी आणि हातात कॅमेरा असलेल्या पंतप्रधानांचा लूक पाहण्यासारखा आहे. (छायाचित्र: पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जंगल सफारीचे काही फोटो समोर आले आहेत. या दरम्यान त्यांची भेट एका सिंहाशीही झाली आहे. (छायाचित्र: पीटीआय)
-
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त, पंतप्रधानांनी एक खास जॅकेट घातले होते ज्यावर सिंहाच्या पंजाचे चित्र छापलेले होते. (छायाचित्र: पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही फोटोग्राफीची खूप आवड आहे. गिरच्या जंगलात ते कॅमेऱ्याने प्राण्यांचे फोटो काढताना दिसले. (छायाचित्र: पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंहासमोर असे दिसले. यादरम्यान, ते थोडा वेळ थांबून हे दृश्य आपल्या डोळ्यांत टिपताना दिसले. (छायाचित्र: पीटीआय)
-
पंतप्रधान मोदी त्यांच्या कॅमेऱ्यात गिरच्या राजा म्हणजेच समोर बसलेल्या सिंहाचे छायाचित्र टिपताना दिसले. (छायाचित्र: पीटीआय)
-
गीरच्या जंगलातील सफारी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काही मंत्री आणि वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. (छायाचित्र: पीटीआय)
-
गीरच्या जंगलात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ नैसर्गिक सौंदर्य पाहिले नाही तर तिथे राहणाऱ्या दुर्मिळ वन्यजीवांचे जवळून निरीक्षण केले आणि त्यांचे फोटोही काढले. (छायाचित्र: पीटीआय)
-
गीरच्या जंगलात आशियाई सिंह देखील आहेत आणि जेव्हा पंतप्रधान मोदींच्या सफारीदरम्यान ते समोर आले तेंव्हा त्यांनी जंगलाच्या राजाचे छायाचित्र त्यांच्या कॅमेऱ्यात टिपले. (छायाचित्र: पीटीआय)
-
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे की आशियाई सिंहांचे हे अभयारण्य त्यांच्यासाठी नेहमीच खास राहिले आहे. (छायाचित्र: पीटीआय)
-
गुजरातचे मुख्यमंत्री असताना केलेल्या संवर्धन प्रयत्नांची आठवण करून देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सामूहिक प्रयत्नांमुळे सिंहांची संख्या हळूहळू वाढते आहे. (छायाचित्र: पीटीआय)
-
आशियाई सिंहांचे अधिवास जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्थानिक आदिवासी समुदायांचे आणि महिलांचेही पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले. (छायाचित्र: पीटीआय)
-
रविवारी पंतप्रधान मोदींनी रिलायन्स जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या प्राणी बचाव, संवर्धन आणि पुनर्वसन केंद्र ‘वंतारा’ लाही भेट दिली. (छायाचित्र: पीटीआय) हेही पाहा-
महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली