-
हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील सांपला बसस्थानकावर शनिवारी एक सुटकेस सापडली. त्यात एका मुलीचा मृतदेह असल्याचे तपासात उघड झाले. तपासाची प्रगती होत असताना मृतक ही स्थानिक काँग्रेसची कार्यकर्ता असून तिचे नाव हिमानी नरवाल असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांना यश आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सचिन असे आरोपीचे नाव आहे.
-
आता या हत्येचे गूढ उकलले जात आहे. या गूढ गोष्टीतील हिमानी आणि सचिन ही दोन नावे आतापर्यंत समोर आली असून दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की, सचिनने हिमानीला तिच्याच ओढणीने बांधले आणि त्यानंतर मोबाइल चार्जरने गळा दाबून तिचा खून केला करण्याभोवती या घटनेची कथा फिरत असल्याचे दिसते.
-
कोण होती हिमानी नरवाल?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सक्रिय काँग्रेस कार्यकर्ता हिमानी सोनीपतच्या कथुरा गावची रहिवासी होती. सोशल मीडियावर ती स्वत:ची ओळख रोहतक ग्रामीणमधील भारतीय युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा म्हणून करत असे. -
काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये आणि रॅलींमध्ये हरियाणाची लोकनृत्ये सादर करण्यासाठीही ती प्रसिद्ध होती.
-
ती काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा यांच्यासोबत कार्यक्रमांमध्ये दिसत असल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेसच्या हरियाणा युनिटच्या नेत्यांनी नरवाल यांचे एक सक्रिय आणि समर्पित कार्यकर्ता म्हणून वर्णन केले, तिने राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रेतही भाग घेतला होता.
-
आपण कायद्याचे शिक्षण घेत असून गेल्या दशकापासून पक्षाशी संबंधित असल्याचे तिने सांगितले होते. गांधींबरोबरचे तिचे फोटोही व्हायरल झाले होते.
-
आईचे आरोप
नरवालची आई सविता यांनी रोहतकमध्ये पत्रकारांशी बोलताना हिमानीने अगदी कमी कालावधीत स्वतःचं राजकीय ओळख निर्माण केल्यामुळे काही काँग्रेस नेते तिच्यावर जळत होते असा आरोप केला. -
त्यांचा मुलगा जतीनही काँग्रेसमध्येच होता. सविता म्हणाल्या, “हिमानीच्या पक्षातील प्रगतीवर जळणारी व्यक्ती किंवा दुसरीही कोणी व्यक्ती या हत्येमागे असू शकते.” नरवालच्या आईने सांगितले की, त्यांच्या मोठ्या मुलाचीही अनेक वर्षांपूर्वी हत्या झाली होती आणि तेंव्हाही त्यांना न्याय मिळाला नाही.
-
पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सचिन या ३० वर्षीय आरोपीला अटक केली आहे. सचिन हा बहादूरगडचा रहिवासी आहे. कनौडी येथे तो मोबाईलचे दुकान चालवतो. तो विवाहित असून त्याला २ मुलेही असल्याची माहिती आहे.
-
(सर्व फोटो: हिमानी नरवाल सोशल मीडिया) हेही पाहा- चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा भारत ऑस्ट्रेलियाशी भिडणार, २०२३ विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढणार?

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ