-
गेल्या अनेक दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर आज त्यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. (Photo: Dhananjay Munde/Facebook)
-
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे काय म्हणाले?
धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की “बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालं आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालं आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे.” (Photo: Dhananjay Munde/Facebook) -
माझ्या सद्सद विवेकबुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला मला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री महोदयांकडे मी राजीनामा दिला आहे. – धनंजय मुंडे (Photo: Dhananjay Munde/Facebook)
-
धनंजय मुंडे यांच्याकडे किती संपत्ती आहे?
धनंजय मुंडे यांची संपत्ती गेल्या पाच वर्षात दुपटीहून अधिक झाली आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रातून त्यांनी ही माहिती जाहीर केली होती. (Photo: Dhananjay Munde/Facebook) -
२०१९ मध्ये धनंजय मुंडे यांनी त्यांच्याकडे एकूण २३ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं म्हटलं होतं. (Photo: Dhananjay Munde/Facebook)
-
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केलंलं आहे की त्यांच्याकडे ५३.८० कोटी रुपयांची संपत्ती आहे. (Photo: Dhananjay Munde/Facebook)
-
धनंजय मुंडे यांच्याकडे १५ कोटींची वाहने, दीड किलो चांदी आहे. तर त्यांच्या नावे १५ कोटी ५५ लाख ५ हजार १०५ रुपयांची विविध वाहनं आहेत. ज्यामध्ये टोयोटा इनोव्हा कार, मर्सिडीज बेंझ जीएलएस ४००, महिंद्रा स्कॉर्पिओ कार, टाटा मोटर्स हेक्सा कारचा समावेश आहे. (Photo: Dhananjay Munde/Facebook)
-
टँकर पासून ते बुलेट पर्यंतच्या सात वाहनांचा यात समावेश आहे. सात लाख तीन हजार रुपयांचे १९० ग्रॅम सोने आहे. (Photo: Dhananjay Munde/Facebook)
-
myneta,info या वेबसाईटवरील माहितीनुसार त्यांच्या पत्नीच्या नावे ३१ लाख ७८ हजार ६७५ रुपयांची दोन वाहने आहेत. २२ लाख ९० हजारांचे ६२० ग्रॅम सोने आणि ७२ हजारांची दीड किलो चांदी आहे. (Photo: Dhananjay Munde/Facebook) हेही पाहा- अखेर धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा, ‘असा’ होता इथवरचा प्रवास…

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ