-
सरकारी कार्यक्षमतेत आघाडीवर असलेल्या देशभरातील जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा, नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी मंगळवारी (४ मार्च) ‘एक्सप्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स अवॉर्ड्स’चे आयोजन करण्यात आले होते. हे या पुरस्कार सोहळ्याचे तिसरे पर्व होते. (Express Photo/Praveen Khanna)
-
पुरस्कारांच्या तिसऱ्या आवृत्तीत, नाविन्यपूर्ण व्यवस्थापन, योजना किंवा प्रकल्पांद्वारे समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काम करणाऱ्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना शिक्षण, आरोग्य, समावेशन, तंत्रज्ञानाचा वापर आणि अशाच प्रकारच्या श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला. (Express Photo/Praveen Khanna)
-
“डीएम (जिल्हा दंडाधिकारी) ही एक व्यक्ती नसते; डीएम ही एक संस्था असते,” असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, ते या समारंभाचे प्रमुख पाहुणे देखील होते. त्यांनी पुढे म्हटले की, देशात या पदावर काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून खूप अपेक्षा असतात. (Express Photo/Praveen Khanna)
-
या कार्यक्रमात विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह हे सन्माननीय पाहुणे होते. (Express Photo/Praveen Khanna)
-
सर्व राज्यांमधून प्राप्त झालेल्या ४५० हून अधिक प्रवेशिकांमधून निवडलेल्या विजेत्यांचे मूल्यांकन पुरस्कारांसाठी नॉलेज पार्टनर (भागीदार) असलेल्या पीडब्ल्यूसीने केले. त्यानंतर द इंडियन एक्सप्रेसच्या राष्ट्रीय प्रतिनिधी आणि संपादकांच्या टीमने फील्डवर जाऊन भेटी देऊन प्रकल्पांची पडताळणी केली. (Express Photo/Praveen Khanna)
-
तामिळनाडूतील कृष्णगिरीचे जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी के.एम. सरयू यांना कृषी क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Express Photo/Praveen Khanna)
-
छत्तीसगडमधील दुर्गचे जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी पुष्पेंद्र कुमार मीणा यांना आरोग्यसेवा पुरस्कार मिळाला. (Express Photo/Praveen Khanna)
-
अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंगचे उपायुक्त सचिन राणा यांना शिक्षण श्रेणीत पुरस्कार देण्यात आला. (Express Photo/Praveen Khanna)
-
राजस्थानच्या सलुंबरचे जिल्हा दंडाधिकारी जसमीत सिंग संधू यांना समाज कल्याणासाठी पुरस्कार मिळाला. (Express Photo/Praveen Khanna)
-
मणिपूरमधील काकचिंग येथे कौशल्य विकासात योगदान दिल्याबद्दल उपायुक्त रोहित आनंद यांना हा पुरस्कार मिळाला. (Express Photo/Praveen Khanna)
-
कर्नाटकातील कलबुर्गी येथील जिल्हाधिकारी फौजिया तरनुम यांना ज्युरी स्पेशल पुरस्कार मिळाला. (Express Photo/Praveen Khanna)
-
तामिळनाडूतील करूरचे जिल्हाधिकारी टी प्रभुशंकर यांना कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पुरस्कार मिळाला. (Express Photo/Praveen Khanna)
-
आसाममधील शिवसागरचे जिल्हा आयुक्त आदित्य विक्रम यादव यांनी शाश्वततेसाठी पुरस्कार जिंकला. (Express Photo/Praveen Khanna)
-
आसामच्या तिनसुकियाचे जिल्हा आयुक्त स्वप्नील पॉल यांना स्वच्छता श्रेणीसाठी पुरस्कार मिळाला. (Express Photo/Praveen Khanna)
-
केंगू झुरिंगला, उखरुल, मणिपूरचे जिल्हा दंडाधिकारी, यांनी ई-गव्हर्नन्स श्रेणीसाठी पुरस्कार जिंकला. (Express Photo/Praveen Khanna)
-
बालासोर, ओडिशाचे जिल्हाधिकारी दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी पुरस्कार मिळाला. (Express Photo/Praveen Khanna)
-
ओडिशाच्या केंद्रपाडा येथील जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी सूर्यवंशी मयूर विकास यांना लिंग आणि समावेशासाठी पुरस्कार मिळाला. (Express Photo/Praveen Khanna)
-
छत्तीसगडमधील जशपूरचे जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी डॉ. रवी मित्तल यांनी स्टार्ट-अप आणि एमएसएमई श्रेणीत पुरस्कार मिळवला. (Express Photo/Praveen Khanna)

Indian Student : भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या; वडिलांची मन हेलावून टाकणारी प्रतिक्रिया, “चार महिन्यांतच…”