-
जगप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ असलेल्या वेरूळ लेणीतील क्रमांक १०च्या लेणीतील भगवान बुद्ध मूर्तीवर १० मार्च रोजी किरणोत्सवाचा क्षण पर्यटकांनी टिपला.
-
मोबाईल फोनमध्ये हा क्षण टिपण्यासाठी अलोट गर्दी झाली होती.
-
स्थापत्य कलाविष्काराचा अद्धभुत नमूना असलेल्या वेरूळ लेणीमध्ये एकूण ३४ लेणी आहेत.
-
यामध्ये १२ बुद्ध लेणी आहेत. तर यातील १० क्रमांकाची बुद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बुद्ध लेणी या विहार आहेत.
-
यातील १०व्या क्रमांकाच्या बुद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणे पडतात.
-
महाराष्ट्रातील बुद्ध लेणीतील हा शेवटचा चैत्य असून हा महायानास समर्पित आहे.
-
तर यामध्ये वज्रयाणाची काही शिल्पे पहावयास मिळतात.
-
यालाच सुतार की झोपडी किंवा विश्वकर्मा मंदिर ही म्हणतात.
-
तर गुजरातमधील लोक बुद्धालाच विश्वकर्मा समजून येथे नमन करतात.
-
याचा उल्लेख त्यांच्या धार्मिक ग्रंथात ही आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
अपहृत ट्रेनमधील १०४ ओलिसांची सुटका, पाकिस्तानी लष्कराचा दावा; चकमकीत ३० जवान शहीद, बलुचिस्तानमध्ये काय घडतंय?