-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. (फोटो-मनसे अधिकृत)
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईतील शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्क मैदानावर जोरदार भाषण केलं. (फोटो-मनसे अधिकृत)
-
राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत नदी स्वच्छता किती आवश्यक आहे ते सांगितलं. देशातील नद्यांची भीषण अवस्था आहे. ज्याला आपण माता म्हणतो देवी म्हणतो त्या नद्यांकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आहे असे राज ठाकरे म्हणाले. गंगा साफ करा असे प्रथम राजीव गांधी म्हणाले होते. तेव्हापासून गंगा साफ होत होते. पंतप्रधान मोदींनी २०१४ मध्ये तेच सांगितलं आहे. (फोटो-मनसे अधिकृत)
-
मुंबईत पाच नद्या होत्या त्यातील चार नद्या मारल्या गेल्या आहेत. सांडपणी झोपडपट्यांमधून मारल्या गेल्या. आता मिठी नदी उरली आहे असे राज ठाकरे म्हणाले.
-
राज्य सरकारच्या महत्वकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र सरकारवर या योजनेमुळं ६३ हजार कोटींचं कर्ज होईल असं राज ठाकरे म्हणाले. ही योजना बंद होणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
-
औरंगजेबाच्या कबरीजवळ केलेली सजावट काढून टाका. तिथे फक्त कबर दिलसली पाहिजे. तिथे एक मोठा बोर्ड लावा. “आम्हा मराठ्यांनी संपवायला आलेला औरंगजेब आम्ही इथं गाडला गेला, हा आमचा इतिहास” असा मजकूर त्यावर लिहा.आम्ही कुणाला गाडलं हे जगाला कळू द्या, असे राज ठाकरे म्हणाले.
-
चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. विकी कौशल मेल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान समजलं का? असा सवाल करत राज ठाकरेंनी टीका केली.
( सर्व फोटो सौजन्य- Express photo by Sankhadeep Banerjee) -
जातीपातीचं राजकारण केलं जातं आहे, त्यातून तरुणांची माथी भडकवली जात आहेत. या सगळ्यापासून वाचायचं असेल तर तु्म्ही सगळ्यांनी एकजूट दाखवली पाहिजे. तसं घडलं तर सरकारही तुम्हाला उत्तरदायी असेल.
-
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर देखील राज ठाकरे यांनी भाष्य केले. त्यांची खूप घाणेरड्या पद्धतीनं हत्या केली गेली. तुमच्या नसांनसात एवढी क्रूरता भरली असेल तर मी जागा दाखवेन तिथे जा असं राज ठाकरे म्हणाले. हे सगळं झालं कशातून? तिथे असणाऱ्या मिल, प्रकल्पातून निघणारी राख, मी आत्तापर्यंत असं ऐकलं होतं की राखेतून फिनिक्स पक्षी भरारी घेतो. बीडमध्ये राखेतून गुंड तयार होतात झाले आहेत.
-
“आजपर्यंत राज्याच्या राजकारणात सर्वात जास्त आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते. मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं? मग काय केलं आमदारांनी, मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण मागावे लागत असेल तर एवढे आमदार मंत्री मुख्यमंत्री का निवडून दिले? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.

वासनेसाठी पवित्र नात्याचा विसर, भरोसा सेलमध्ये सुटला नाजूक गुंता