-
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वुर हुसेन राणा याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेत भारताला अखेर मोठे यश मिळाले आहे. (Photo: REUTERS)
-
पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आणि दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीचा जवळचा सहकारी तहव्वुर राणा याचे अमेरिकेतून भारतात यशस्वीरित्या प्रत्यार्पण करण्यात आले आहे. (Photo: REUTERS)
-
प्रत्यार्पणासाठी दीर्घ कायदेशीर आणि राजनैतिक लढाई
भारत अनेक वर्षांपासून राणाच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत होता. अमेरिकेत, राणाने प्रत्यार्पण टाळण्यासाठी स्थानिक न्यायालयांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व कायदेशीर पर्यायांचा प्रयत्न केला – परंतु प्रत्येक वेळी त्याला निराशाच मिळाली. (Photo: REUTERS) -
अखेर, ९ एप्रिल २०२५ रोजी, यूएस मार्शलनी राणाला लॉस एंजेलिस विमानतळावर भारताच्या स्वाधीन केले. गुरुवारी संध्याकाळी त्याला एका विशेष विमानाने दिल्लीला आणण्यात आले. (Photo: REUTERS)
-
एनआयएचा मोठा खुलासा
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर केले आणि २० दिवसांची कोठडी मागितली, त्यापैकी न्यायालयाने १८ दिवसांची कोठडी मंजूर केली. (ANI Photo) -
एनआयएने न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होते की राणा २६/११ हल्ल्याच्या कटात पूर्णपणे सहभागी होता. (ANI Photo)
-
हल्ल्यापूर्वी हेडलीने राणाला एक ईमेल पाठवला होता, ज्यामध्ये हल्ल्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांचा आणि पैशांचा उल्लेख होता. (ANI Photo)
-
यासोबतच या कटात दहशतवादी इलियास काश्मिरी आणि अब्दुर रहमान यांच्या सहभागाची माहितीही देण्यात आली. (ANI Photo)
-
राणाची भूमिका हेडलीला लॉजिस्टिक सपोर्ट पुरवण्यापुरती मर्यादित नव्हती, तर त्याने हेडलीला जाणूनबुजून मुंबईतील त्याच्या इमिग्रेशन व्यवसायाच्या कार्यालयात “बनावट व्यवस्थापक” म्हणून नियुक्त केले होते जेणेकरून तो हल्ल्यांपूर्वी शहराची रेकी करू शकेल. (ANI Photo)
-
बेड्यांमध्ये अडकला
राणाचा जो फोटो समोर आला आहे तो केवळ एका गुन्हेगाराच्या प्रत्यार्पणाचाच नव्हे तर भारताच्या वर्षानुवर्षे चाललेल्या कायदेशीर आणि राजनैतिक लढाईच्या विजयाचे प्रतीक बनला आहे. (एएनआय फोटो) -
फोटोमध्ये दिसते आहे की राणाच्या पायात बेड्या घालून, कंबरेला साखळ्या घालून आणि एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्याला दोन्ही बाजूंनी धरून ठेवलेले आहे. (PTI Photo)
-
एनआयएकडे कोणते पुरावे आहेत?
एनआयएने न्यायालयाला सांगितले की, भारतात येण्यापूर्वी हेडलीने राणासोबत संपूर्ण ऑपरेशनच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली होती. (ANI Photo) -
एका ईमेलमध्ये, हेडलीने राणाला हल्ल्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची आणि पैशांची माहिती देखील पाठवली. (ANI Photo)
-
त्याच ईमेलमध्ये त्याने इलियास काश्मिरी आणि अब्दुर रहमान यांच्या भूमिकेचाही उल्लेख केला होता. (ANI Photo)
-
राणावर हत्या, दहशतवाद, कट रचणे आणि बनावट कागदपत्रे बनवण्यासह १० गंभीर गुन्हेगारी खटले दाखल केले जातील. (PTI Photo)
-
पश्चात्तापाची भावना नाही.
भारत सरकारचे म्हणणे आहे की हल्ल्यांनंतरही राणाला कोणताही पश्चात्ताप झाला नाही. (PTI Photo) -
त्याने डेव्हिड हेडलीला सांगितले की “भारतीयांबरोबर हेच व्हायला हवे होते” एवढेच नाही तर मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी सन्मान निशान-ए-हैदर देण्याची वकिलीही त्याने केली होती. (PTI Photo)
-
राणावर १० फौजदारी खटले दाखल होणार आहेत.
तहव्वुर राणा याच्यावर भारतातील १० गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये खटला चालवला जाईल. या प्रकरणांमध्ये हत्या, दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग, बनावट कागदपत्रे बनवणे आणि आंतरराष्ट्रीय कट रचणे यासारखे आरोप आहेत. (PTI Photo) -
२६/११ च्या हल्ल्यात १७५ लोक मृत्युमुखी पडले आणि ३०० हून अधिक जण जखमी झाले, ज्यात सहा अमेरिकन नागरिकांचा समावेश होता. (PTI Photo)
-
खरा खेळ अजून यायचा आहे.
आता राणा भारताच्या ताब्यात असल्याने, आता खरी चौकशी प्रक्रिया सुरू होईल. राणाचे विधानं जसजशी बाहेर येतील तसतसे आणखी बरेच चेहरे आणि त्याने रचलेले कट बाहेर शकतात. (PTI Photo) -
भारताला आशा आहे की राणाच्या साक्षीमुळे पाकिस्तानची भूमिका आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या संघटनांचे नेटवर्क उघड होईल. (PTI Photo)
-
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा आता एनआयएच्या ताब्यात आहे. आज त्याची चौकशी केली जात आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून दहशतवादी राणाची एनआयएकडून चौकशी सुरू झाली आहे. (PTI Photo)
-
एनआयएचे एसपी आणि डीएसपी दर्जाचे अधिकारी दहशतवादी राणाची चौकशी करत आहेत. एनआयए चौकशी कक्षात सीसीटीव्हीसमोर राणाची चौकशी केली जात आहे. (PTI Photo)
-
तहव्वुर हुसेन राणाचे भारतात प्रत्यार्पण हे २६/११ हल्ल्यातील पीडितांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी न्यायाच्या आशेचा एक मोठा किरण आहे. (PTI Photo)
-
तसेच भारताच्या न्यायव्यवस्थेसाठी आणि दहशतवादाविरुद्धच्या दृढनिश्चयासाठी हा एक मोठा विजय आहे. आता राणाच्या साक्षीतून कोणते खुलासे होतील आणि न्यायाच्या दिशेने आणखी कोणती पावले उचलली जातील याकडे देशाचे लक्ष लागले आहे. (ANI Photo)
Devendra Fadnavis: सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाची दांडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार