-
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. सध्या या हल्ल्याबद्दल संपूर्ण देशात संताप आहे आणि प्रत्येक भारतीय सरकारला पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आवाहन करत आहे. (Photo: PTI)
-
भारत सरकारने एक मोठा निर्णय घेत सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत आणि त्यांना १ मे पर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सिंधू पाणी करारही थांबवण्यात आला आहे. (Photo: PTI)
-
भारत सरकारने आणखी एक काम केले तर काही दिवसांत पाकिस्तान पूर्णपणे नष्ट होईल. त्याची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडेल आणि संपूर्ण देशात अराजकता माजेल, याबाबतचे काही दावे सोशल मीडियावर लोकप्रिय असणारे शिक्षक ‘खान सर’ यांनी केले आहेत. (Photo: PTI)
-
पाकिस्तानविरुद्ध आता छोटं सर्जिकल स्ट्राईक नको तर त्यांना मोठा धक्का देण्याची वेळ आली आहे, असेही खान सर म्हणाले. (Photo: Khan Global Studies/FB)
-
खान सर म्हणाले, अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरू आहे. अमेरिकेने चीनवर २४५ टक्के कर लादला आहे. यामुळे जगातील मोठे उद्योगपती भारताकडे वळतील. (Photo: Still From Khan GS Research Centre Youtube)
-
अशा परिस्थितीत मोठे उद्योग भारताकडे वळू नयेत म्हणून पाकिस्तानच्या नावाखाली असे हल्ले करून भारतात अशांतता पसरवण्याचा चीनचा डाव असू शकतो, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. (Photo: Still From Khan GS Research Centre Youtube)
-
खान सरांच्या मते, जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटन वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत तिथल्या लोकांचे उत्पन्न वाढत आहे, जे पाकिस्तानला रुचलेले नाही. कारण असे हल्ले करून ते पर्यटन संपवू इच्छितात. काश्मिरी लोकांकडे नोकरी किंवा उत्पन्नाचा स्रोत उरणार नाही, तेव्हा ते त्यांना बंदुका उचलण्यासाठी उकसवतील. काश्मिरींना हे समजून घ्यावे लागेल की त्यांचा सर्वात मोठा शत्रू पाकिस्तान आहे. (Photo: Still From Khan GS Research Centre Youtube)
-
खान सर म्हणतात की, जर पाकिस्तान काश्मीरच्या मागे नसता तर जम्मू आणि काश्मीरचा विकास गोवा आणि सिंगापूरच्या विकासाप्रमाणेच झाला असता. (Photo: Still From Khan GS Research Centre Youtube)
-
खान सरांच्या मते, सिंधू जल करार स्थगित करणे हा पाकिस्तानसाठी कायमचा उपाय नाही. कारण पाणी वळवल्यानंतर आपण ते कुठे नेणार? यासाठी भारत सरकारने अनेक धरणे बांधावीत आणि पाकिस्तानचे सर्व पाणी थांबवावे. (Photo: Still From Khan GS Research Centre Youtube)
-
खान सर म्हणतात की भारत सरकारने उन्हाळ्यात सिंधू नदीचे पाणी थांबवावे आणि पावसाळा आला की संपूर्ण धरण उघडावे. पाकिस्तानमध्ये पुरामुळे मोठी आपत्ती निर्माण होईल. कारण पाकिस्तानने मानवतेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. अशा परिस्थितीत, राक्षसांना राक्षसांसारखेच वागवावे लागेल. (Photo: Still From Khan GS Research Centre Youtube)
-
पहलगाम हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज नाही. कारण हा कायमचा उपचार नाही. ५० दहशतवाद्यांना मारून काहीही साध्य होणार नाही. त्यांच्यावर ठोस उपचार करणे आवश्यक आहे. पाकिस्तानातील सर्व २४ कोटी लोकांना हे समजावून सांगणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. (Photo: Still From Khan GS Research Centre Youtube)
-
खान सर त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हणतात की, भारत सरकारने समुद्र मार्ग अडवावा. खरं तर, पाकिस्तानचा माल अरबी समुद्रामार्गे जातो, त्यासाठी त्याला प्रथम भारतात प्रवेश करावा लागतो. (Photo: Indian Navy/FB)
-
समुद्रमार्गात अडथळा निर्माण केल्यास पाकिस्तानला कोणताही पुरवठा मिळू शकणार नाही. पाकिस्तानकडे फक्त ९ दिवस पुरेल इतका पेट्रोलियम साठा आहे आणि त्यानंतर त्यांची खरी पंचाईत होईल. (Photo: Indian Navy/FB)
-
भारत सरकारने वर सिंधू जल कराराला स्थगिती द्यावी आणि खाली समुद्रात नाकेबंदी करावी. म्हणजे पाकिस्तानला चांगला धडा मिळेल. पाकिस्तान पूर्णपणे नष्ट होईपर्यंत सरकारने हे करावे. (Photo: Indian Navy/FB)
-
खार सर त्यांच्या व्हिडिओमध्ये असेही सांगतात की, समुद्रमार्गातील नाकेबंदी खूप महत्वाची आहे. कारण १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान भारताने अशी नाकेबंदी केली होती आणि पाकिस्तानी सैन्याने माघार घेतली. पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त करावी लागेल, तरच ते सरळ होतील. (Photo: PTI)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल