-
‘हैदर’ हा चित्रपट अनेक अर्थांनी शाहीद कपूरच्या कारकीर्दीला कलाटणी देणारा चित्रपट ठरला. शेक्सपिअरच्या हॅम्लेट या कादंबरीवर आधारित ‘हैदर’ने समीक्षक आणि प्रेक्षक दोघांचीही वाहवा मिळवली.
-
शाहीद कपूरच्या कारकीर्दीत हैदरनंतर कोणत्या चित्रपटाचा मोठा वाटा असेल, तर ‘जब वी मेट’चा उल्लेख करावा लागेल . इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटात शाहीदच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
-
शाहीद कपूरच्या प्रतिभेला दिग्दर्शक विशाल भारद्वाजने खऱ्या अर्थाने न्याय दिला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. २००९ साली आलेल्या विशाल भारद्वाजच्या ‘कमीने’ या चित्रपटात शाहीदने दुहेरी व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारल्या होत्या.
-
शाहीद कपूरच्या कारकीर्दीतील मोजक्या चित्रपटांचा उल्लेख करावयाचा झाल्यास जॉन मॅथ्यू मथायच्या ‘शिखर’ या चित्रपटाचे नाव घ्यावे लागेल. या अनेक चित्रपटात अनेक कलाकारांची गर्दी असूनही शाहीदने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
-
गोड चेहऱ्याच्या शाहीद कपूरने ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामुळे शाहीदचे चित्रपटसृष्टीत दणक्यात पदार्पण झाले. त्यावर्षीच्या बहुतेक पुरस्कार सोहळ्यांत शाहीदला सर्वोत्कृष्ट पदार्पणचा पुरस्कार मिळवला.
-
‘विवाह’ हा चित्रपट व्यवसायिकदृष्ट्या तितकासा यशस्वी ठरला नसला तरी, या चित्रपटात शाहीदने साकारलेली प्रेम ही व्यक्तिरेखा अनेकांच्या पसंतीस उतरली. विशेषत: शाहीदच्या वुमन फॅन फॉलोअिंगमध्ये या चित्रपटामुळे आणखीनच भर पडली.
-
‘दिल बोले हडीप्पा’ या नायिकाप्रधान चित्रपटाचा मुख्य झोत होता तो अभिनेत्री राणी मुखर्जीवर. राणी मुखर्जीचा कमबॅक म्हणून या चित्रपटाकडे पाहिले गेले. मात्र, शाहीद कपूरने या चित्रपटातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
-
शाहीद कपूर आजपर्यंत नेहमी त्याचे वडील पंकज कपूर यांच्याकडून अभिनयाचे धडे गिरवत आल्याचे सांगत आला आहे. पंकज कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मौसम’ हा चित्रपट शाहीदच्या अभिनयासाठी पाहिलाच पाहिजे.
-
शाहीदच्या कारकीर्दीतील ‘फिदा’ हा दुसरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तितकासा यशस्वी ठरला नाही. मात्र, या चित्रपटाने शाहीदच्या अभिनयगुणांवर शिक्कामोर्तब केले.
-
शाहीदने आजवरच्या कारकीर्दीत अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र, २०१३ साली आलेल्या ‘आर.राजकुमार’ या चित्रपटाच्या निवडीमुळे शाहीद समीक्षकांच्या टीकेचा धनी ठरला होता. मात्र, या हटके भूमिकेत प्रेक्षकांनी शाहीदला विनाकारण स्विकारले.

Video : जीव महत्त्वाचा की अहंकार? अँब्युलन्सला रस्ता देण्यासाठी बसने केले कारला ओव्हरटेक, पण पुढे जे घडले…; पुण्यातील एसबी रोडवरील व्हिडीओ व्हायरल