-
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरूवारी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प मांडला. (पीटआय)
-
सुमारे सव्वातासाच्या भाषणामध्ये प्रभू यांनी रेल्वेच्या पुनर्जन्माचे आश्वासन देतानाच आपला सर्व भर प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर असल्याचे स्पष्ट केले.(पीटीआय)
-
स्वच्छता, तिकिटांची उपलब्धता, रेल्वेगाड्यांचा वेग, रेल्वे डब्यांची रचना, स्थानकांवरील सुविधा, अपघात टाळणे, व्यवस्थापन या सर्व स्तरांवर आमुलाग्र बदल करण्यात येणार आहे. (पीटीआय)
-
रेल्वेच्या विकासासाठी चार उद्दिष्टे निश्चित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.(पीटीआयः
-
त्यामध्ये प्रवाशांच्या अनुभवांचे मापन, सुरक्षितता, पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिकदृष्ट्या तंदुरुस्ती याचा समावेश आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी त्यांनी ११ कलमी कार्यक्रमही आखला आहे. (पीटीआय)
-
अकरा कलमी कार्यक्रमाच्या आधारे पुढील काळात रेल्वे विकास साध्य केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.(पीटीआय)
-
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरूवारी संसदेत अत्यंत वेगळ्या धाटणीचा रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना मुंबईकरांसाठी वातानुकूलित रेल्वेगाड्यांची घोषणा केली.
-
नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा धागा पकडून आगामी काळात रेल्वेतील स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येणार आहे. तर सर्वसामान्यांसाठी रेल्वेच्या जनरल डब्यात मोबाईल चार्जिंगची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.
-
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत कार्यक्रमावर आधारित रेल्वेमध्ये ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत’ कार्यक्रम आखण्यात आला असून त्याअंतर्गत रेल्वेमधील आणि स्थानकांवरील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्यात येणार आहे.(पीटीआय)
-
रेल्वेच्या सद्यस्थितीवर आधारित श्वेतपत्रिकाही प्रभू यांनी गुरुवारी लोकसभेत सादर केली. रेल्वेच्या नियोजित खर्चामध्ये दुपटीने वाढ करण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. (पीटीआय)
-
रेल्वेमधून प्रवास करणाऱयांना तिकीट काढताना कोणताही त्रास सहन करावा लागू नये, यासाठीही त्यांनी काही नव्या सुविधांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आता कोणत्याही गाडीचे आरक्षण चार महिने अगोदर करता येईल.(पीटीआय)
-
तब्बल १६ वर्षांनी केंद्रीय रेल्वेमंत्रीपदी महाराष्ट्रातील व्यक्ती विराजमान झाल्याने मुंबईसह संपूर्ण राज्याला सुरेश प्रभू यांच्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मोजक्याच घोषणा करून अनेकांना संभ्रमात टाकले आहे.
-
महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून, याअंतर्गत महिलांच्या डब्यात आणि मुंबईतील उपनगरीय स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO