-
श्रीनगरमधील बर्फाच्छादीत लाकडी पुलावरून मार्गक्रमण करणारा काश्मिरी मुलगा. काश्मिरमधील अनेक ठिकाणी पुन्हा बर्फवृष्टी सुरू झाली असून, विद्युतपुरवठ्याबरोबरच श्रीनगर आणि जम्मू दरम्यानची हवाई आणि रस्ते वाहतूकसुध्दा विस्कळीत झाली आहे. (छाया- एपी)
-
गेल्या दोन दिवसापासून काश्मिरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. श्रीनगर येथील एक नावाडी आपली नाव वल्हवताना. (छाया – एपी)
-
बर्फाच्छादीत श्रीनगर (छाया – पीटीआय)
-
रविवारी काश्मिरमधील कुलगाव आणि अन्य ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली. राज्यात दिवसभर पावसानेदेखील हजेरी लावली होती. (छाया – पीटीआय)
-
काश्मिर खो-यात जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने स्थानिकांना दैनंदिन कामकाजामध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (छाया – पीटीआय)
-
बेजबीहारा येथे बर्फाच्छादीत रेल्वेमार्गातून मार्गक्रमण करणारी रेल्वे. गेल्या आठवड्यापासून खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊसदेखील पडत आहे. (छाया – पीटीआय)
-
बर्फवृष्टी होत असताना अनंतनाग येथे टिपण्यात आलेले रेल्वेचे छायाचित्र. (छाया – पीटीआय)
-
बर्फाच्छादीत रेल्वेमार्गातून मार्गक्रमण करताना काश्मिरी नागरिक. (छाया – पीटीआय)
-
अनंतनाग येथील एक काश्मिरी स्त्री जळणासाठी डोक्यावरून लाकूड-फाटा वाहून नेताना. (छाया – पीटीआय)

होळीच्या दोन दिवसानंतर ‘या’ तीन राशींना मिळणार जबरदस्त धन लाभ, चंद्र-शुक्राच्या कृपेने मिळेल अपार श्रीमंती