-
जोधपूरमध्ये खास एअर शो चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २१ स्वेड्रोन आणि ११६ हेलिकॉप्टर यूनीटचे सादरीकरण झाले. (पीटीआय)
-
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जगमोहन दालमियांचे अभिनंदन करताना कोलकातीतील शालेय-क्रिकेट स्पर्धेतील क्रिकेटपटू विद्यार्थी. (पीटीआय)
-
ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवर डेव्हिड वॉर्नरने पर्थवर अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात १७८ धावांची धुवांधार खेळी साकारली.(पीटीआय)
-
चीन येथे सुरू असलेल्या राजकीय मार्गदर्शन परिषदेदरम्यान बिजींग येथील ग्रेट हॉल ऑफ पीपल सभागृहात राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिलेले चीनमधील शिष्टमंडळांचे सदस्य. (छाया- पीटीआय)
चिली येथील विलारिका ज्वालामुखीचा मंगळवारी दुपारी स्फोट झाला. (छाया- पीटीआय) -
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी दरड कोसळली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी येथील मातीचा ढिगारा हटविण्याचे काम जोरात सुरू होते. (छाया- पीटीआय)
-
भायखळ्याजवळील फेरबंदर, घोडपदेव परिसरातील एक मजली चाळीला मंगळवारी सायंकाळी भीषण आग लागली. घरातील पाच सिलेंडरचा स्फोट झाल्याने भडकलेल्या आगीत संपूर्ण चाळ भस्मसात झाली असून, आग विझविताना अग्निशमन दलाचे सहाय्यक केंद्र अधिकारी आणि तीन जवान जखमी झाले.
-
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मंगळवारी आंतरराष्ट्रीय शांतता राखणाऱ्या संस्थांना रशियन बंडखोरांचा हल्ला सुरू असणाऱ्या पूर्वेकडील भागांमध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. या पार्श्वभूमीवर युक्रेन सैन्याच्या चौकी असलेल्या ठिकाणाचे टिपलेले दृश्य. यावेळी येथून जात असलेल्या गाडीतील श्वान कुतूहलाने कॅमेऱ्याकडे बघताना. (छाया- पीटीआय)

“मी एकटाच वेगळा…”, नाना पाटेकरांनी पत्नीबरोबर न राहण्याबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिचे खूप उपकार…”