-
मेट्रो-३ साठी कारशेड उभारण्यासाठी आरे कॉलनीतील होणाऱया वृक्षतोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
सुरतमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची होळी साजरी करून जनजागृती करण्यात आली. (पीटीआय)
-
दाल सरोवर परिसरात श्रीनगरच्या बर्फाच्छादीत सौंदर्याचा नयनरम्य नमूना.(पीटीआय)
-
मुंबईत एका प्रमोशनल कार्यक्रमात बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने उपस्थिती लावली.(पीटीआय)
-
गेले काही दिवस सुरू असलेल्या आम आदमी पार्टीतील वादंगाने बुधवारी वेगळेच वळण घेतले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सकाळी पक्षाच्या निमंत्रक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बंडाचा झेंडा फडकाविल्याचा आरोप असलेले आपचे नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण या ज्येष्ठ नेत्यांची राजकीय व्यवहार समितीमधून (पीएसी) हकालपट्टी करण्यात आली. (छाया- पीटीआय)
-
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू यांनी होळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कलाकारांसोबत नृत्याचा ठेका धरला. (छाया- पीटीआय)
-
युक्रेनच्या डोनस्टक येथील कोळशाच्या खाणीत झालेल्या स्फोटामुळे तब्बल ३० कामगार आतमध्ये अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या कोळसा मंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिली. (छाया- पीटीआय)
होळी सणात डफप्रमाणे दिसणाऱ्या ‘टिमकी’या वाद्याचे अनोखे महत्त्व आहे. होळीभोवती टिमकी वाजवीत फेर धरला जातो. टिमकी तयार करण्यात मग्न येवल्यातील कारागीर (छाया- संतोष बटाव) संसद भवन परिसरात बुधवारी भाजप खासदार जगदंबिका पाल व हेमा मालिनी यांनी होळी साजरी केली. (छाया- पीटीआय)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित