-
गडद रंग, थिरकायला लावणारे संगीत, तोंडाला पाणी सुटेल असे पदार्थ, गुजिया …. रंगपंचमी म्हटली की टीव्ही कलाकारांच्या डोक्यात आधी या गोष्टी येतात. रंगपंचमी टीव्ही कलाकारांच्या रंगपंचमीशी जुडलेल्या आठवणी जाणून घेऊया.
-
अदा खान- गेल्यावर्षी राजन सरांच्या घरी अंकित आणि डिम्पलसोबत साजरी केलेली रंगपंचमी ही माझी सर्वात चांगली होळी होती. त्याच्या आदल्या वर्षीची होळी ही माझी सर्वात वाईट होळी होती. मी रस्त्त्यावरून जात होते आणि माझ्यावर रस्त्यावरील काही मुलांनी फुगे मारले होते.
-
वाहबीझ दोरबजी- मी दरवर्षीचं खूप आनंदात रंगपंचमी साजरी करते. माझी वाईट आठवण म्हणाल तर, एक वर्ष मी भांग प्यायले होते तो फार वाईट अनुभव होता. मी सर्वांनाच सांगेन की भांगपासून जरा दूरचं राहा.
-
जय सोनी- लहानपणी साजरी केलेली होळी हीच माझी सर्वांत चांगली आठवणीतली आहे. मित्र, कुटुंब, शेजारी यांच्यासोबत खूप मजा करायचो.
-
रोहित रॉय- शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्यासह मी मित्रांसोबत रंगपंचमी साजरी करतो. त्यापूर्वी आम्ही बच्चन कुटुंबियांसह रंगपंचमी साजरी करायचो. खासकरून अमिताभ यांच्यासह रंग बरसे …. या गाण्यावर नाचण्याचा आनंदच काही वेगळा होता.
-
टीना दत्त- माझी सर्वाच चांगली होळी ही फार रोमॅण्टिक होती. एका खास व्यक्तिसह मी रंगपंचमी खेळले होते.
-
विभा आनंद- गेल्यावर्षीची रंगपंचमी माझी सर्वात चांगली होती. माझे कुटुंबिय आणि महाभारतच्या टीमसोबत मी रंगपंचमी साजरी केली होती. होळीच्या माझ्या कोणत्याच वाईट अशा आठवणी नाहीत. मी नेहमीच आनंदात हा सण साजरा करते.
-
गुंजन उत्रेजा- कॉलेजच्या दिवसांमध्ये रंगपंचमी साजरी करण्याचा आनंदच काही वेगळा होता. आम्हा मित्रांचा मोठा ग्रुप होता आणि आम्ही सुंदर मुलींना रंग लावायचो, जरी त्या अनोळकी असल्या तरी. पण गेले दोन-तीन वर्षी मी रंगपंचमी खेळलोच नाही.
-
रिद्धी डोग्रा- होळी म्हटलं की मला लहानपणी दिल्लीत साजरी केलेल्या रंगपंचमीची आठवण येते. या सणाच्यावेळीच आमच्या परिक्षा असायच्या तरीही आम्ही खूप मज्जा करायचो.
-
मोहम्मज नझिम- मी मजा म्हणून साजरी करतो. दहा वर्षापूर्वी माझ्या चुलत भावासोबत साजरी केलेली रंगपंचमी माझी सर्वात चांगली होळी होती. तेव्हा तर आम्ही अंडीसुद्धा एकमेकांवर फेकली होती, इतकी मजा मी कधीचं केली नव्हती.

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका