-
पर्थच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनी आपले रंग उधळत सामना रंगात आणला होता. दिमाखात विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय संघाचा बेरंग होणार, अशी भीती वाटत असली तरी शांत चित्ताने खेळणाऱ्या धोनीने खेळपट्टीवर ठाण मांडत भारताला चार विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
-
ख्रिस गेलचा झेल टीपताना मोहित शर्मा.
-
ख्रिस गेलला मोहम्मद शमीने २१ धावांवर माघारी धाडले.
-
आव्हानाचा पाठलाग करताना भारताने शतकासमीप अर्धा संघ गमावला होता. पण धोनीने एक बाजू लावून धरून रडतखडत विजय मिळवला आणि दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली.
-
वेगवान खेळपट्टीवर नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतीय गोलंदाजांनी त्यांना हतबल करून सोडले
-
ख्रिस गेलने वेस्ट इंडिजकडून २१ धावा केल्या.
-
धडाकेबाज ख्रिस गेलसह तीन फलंदाजांना बाद करीत सामनावीर मोहम्मद शमीने वेस्ट इंडिजच्या डावाला धक्के दिले
-
शमी आणि उमेश यादव या जोडीने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना चकित करीत त्यांना झटपट बाद करण्यात यश मिळवले.
-
-
टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीची कमाल यावेळी भारतीय चाहत्यांना पाहायला मिळाली.
-
रामदिनला उमेश यादवने भोपळाही न फोडू देता माघारी धाडले.
-
सध्याचा फॉर्म पाहता भारतीय संघ हे आव्हान लीलया पेलेल, असे वाटले होते. पण वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाज ढेपाळले. अजिंक्य रहाणेचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी बेजबाबदार फटके खेळत पराभवाला आमंत्रण दिले होते
-
-
धोनीने सावध फलंदाजी करीत संघाला विजयावर शिक्कामोर्तब करूनच मैदान सोडले. धोनीने आर. अश्विनच्या (नाबाद १६) साथीने सातव्या विकेटसाठी ५१ धावांची अभेद्य भागीदारी रचली
-
या विजयासह टीम इंडियाने उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला.
-
शमी आणि उमेश यादव या जोडीने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना चकित करीत त्यांना झटपट बाद करण्यात यश मिळवले. या दोघांना अन्य गोलंदाजांनीही सुरेख साथ दिल्यामुळे त्यांची ७ बाद ८५ अशी दयनीय अवस्था केली होती.
-
सामन्यात टीम इंडियाने काही महत्त्वाचे झेलसुद्धा सोडले होते नाहीतर, वेस्ट इंडिजचा संघ १८२ धावांच्या आतच गार झाला असता.
-
भारतीय गोलंदाजीचे दमदार प्रदर्शन वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाले.
-
रंगपंचमीच्या दिवशी भारतीय संघ मैदानात बेधडकपणे विजयाचे रंग उधळेल, अशी साऱ्यांनाच अपेक्षा होती.
-
भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजची फलंदाजी फळी पूर्णपणे फोडून काढली.
मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार अन् कर्जही फिटणार