-
मुस्लिमांना शिक्षण आणि नोकरीमध्ये देण्यात आलेले पाच टक्के आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंगळवारी विधानभवनाबाहेर जोरदार निषेध केला. (पीटीआय)
-
हॉलिवूड चित्रपट ‘ब्रोकन हॉर्सेस’चा ट्रेलर प्रदर्शित करताना एकत्र आलेले अभिनेता अमिताभ बच्चन, आमीर खान आणि चित्रपट निर्माता विधू विनोद चोप्रा. (पीटीआय)
-
एका अज्ञात समाजकंटकाने कल्याणमधील स्काय वॉकचे छत जाळले. (छाया – दीपक जोशी)
-
पश्चिमबंगालमध्ये गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्याच्या तयारीमध्ये डावे आहेत. सोमवारी माकपचे संपुर्ण पॉलिट ब्यूरो कोलकाता येथे प. बंगाल राज्य अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी हजर होते. (छाया: पीटीआय)
-
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सोमवारी सुरूवात झाली असून, युती सरकारची कोंडी करण्यासाठी सर्व विरोधक एकवटल्याचे चित्र दिसत आहे. (छाया: गणेश शिर्सेकर)
-
ठाणे जिल्ह्यातील प्रथम महिला रिक्षाचालक आशा विश्वकर्मा यांनी पतीच्या निधनानंतर रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. तीन महिन्यांमध्ये त्यांनी ते प्रशिक्षण पूर्ण केले. सध्या उल्हासनगर भागात त्या रिक्षा चालवून कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहेत. (छाया: दिपक जोशी)
-
निशानेबाज राही सरनोबत, राईफल शुटर तेजस्विनी सावंत आणि अंजली भागवत यांनी सोमवारी नरिमन पॉइंट येथील विधानभवनाच्या प्रांगणात हजेरी लावली होती. (छाया: पीटीआय)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित