-
आयर्लंडच्या २६० धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत टीम इंडियाने हॅमिल्टनच्या मैदानात विश्वचषकातील सलग पाचव्या विजयाची नोंद केली
-
‘दे धक्का’ मंडळी म्हणून ओळख असलेल्या आयर्लंडचा भारती संघासमोर काही टीकाव लागला नाही.
-
भारताकडून शिखर धवनने आयर्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत केवळ ८५ चेंडूत ११ चौकार आणि पाच खणखणीत षटकारांच्या जोरावर १०० धावांची सर्वोच्च खेळी साकारली.
-
धवनने लगावलेले पाच उत्तुंग षटकार पाहण्यासारखे होते.
-
रोहितने आपल्या ठेवणीतल्या फटक्यांना दमदार सुरूवात केली.
-
मोहम्मद शमीने तीन विकेट्स घेतल्या.(पीटीआय)
-
धवनने आयर्लंडच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले.
-
धवनचे अभिनंदन करताना विराट कोहली.
-
धवनने आपल्या पोटडीतील जोरकस फटक्यांनी स्टेडियम गाजवले.
-
झेल टीपताना मोहम्मद शमी.
-
सुरूवातीच्या दहा षटकांत भारतीय गोलंदाजांना यश मिळाले नाही. मोहम्मद शमीची सुरूवातीला गोलंदाजी निष्प्रभ ठरताना दिसली.
-
भारतीय संघाच्या सलामीवीरांची विक्रमी भागीदारी.
-
-
अखेर विराट आणि रहाणे यांनी टीम इंडियाच्या विजयावर आपल्या नाबाद खेळीने शिक्कामोर्तब केले.
-
पंधराव्या षटकानंतर आयर्लंडच्या डावाला उतरती कळा लागली.
-
सुरूवातीला दमदार फलंदाजी करणारे आयर्लंडचे फलंदाज पंधरावाच्या षटकानंतर चाचपडताना दिसले.
-
शतक झळकावल्यानंतर मोठ्या फटका मारण्याच्या नादात धवन झेलबाद झाला.
-
भारतीय संघाच्या फिरकीपटूंनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
-
अश्विनने आयर्लंडच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले.
-
४९ व्या षटकात आयर्लंडचा डाव २५९ धावांत संपुष्टात आला.
-
ओब्रायनने चांगली फलंदाजीच्या माध्यमातून आयर्लंडने सामन्यात पुनरागमन केले होते.
-
मोहम्मद शमीने केव्हिन ओब्रायनला अवघ्या एका धावेवर माघारी धाडले.
-
विराट कोहलीने उत्तम क्षेत्ररक्षण करून त्रिफळांवर फेकलेला चेंडू स्टुअर्ट थॉम्पसन साठी घातक ठरला आणि तो धावचित झाला.
-
-
-
अखेरच्या षटकांत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भेदक माऱयासह आयर्लंडला रोखून धरले.
-
फिरकी गोलंदाजीवर आयर्लंडच्या फलंदाजांना धावा करताना संघर्ष करावा लागत असल्याने धोनीने अश्विनकडून झटपट आठ षटके टाकून घेतली
-
दमदार सुरुवात करूनही आयर्लंडला २५९ धावांपर्यंतच मजल मारता आली.
-
रोहित आणि शिखरने टीम इंडियासाठी सलामीसाठी १७४ धावांची ऐतिहासिक भागीदारी रचली.
-
धवन अगदी सहजरित्या चेंडूला सीमारेषेपार पाठवत होता.
-
रोहितने सामन्यात ३ षटकार आणि ३ चौकार ठोकले.
-
रोहितने ६४ धावांची दमदार खेळी केली.
-
रोहितच्या बॅटला स्पर्श करून गेलेला स्टुअर्ट थॉम्पसनचा चेंडू अनवधानाने त्रिफळांना आदळण्याने रोहित बाद झाला.
-
कोहलीने आपल्या नजाकती फटक्यांनी खणखणीत चार चौकार पेटवले.
-
रहाणेने नाबाद ३३ धावा ठोकल्या.
-
संघाचे सलामीवीर माघारी परतल्यानंतर कोहली आणि अजिंक्यने विजयाकडे कूच केली.
-
आयर्लंडच्या सलामीवरांनी दमदार सुरूवात करून दिली होती. कर्णधार विल्यम पोर्टरफील्ड आणि स्टर्लिंगच्या ८९ धावांच्या भागीदारीने आयर्लंड संघ भारतापुढे दमदार भक्कम आव्हान उभे करण्याच्या पूर्ण तयारीत असल्याचे दिसून आले.
-
धवनच्या खेळीत ११ दमदार चौकारांचा समावेश होता.
-
रोहित, धवन बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी अनुक्रमे ४४ आणि ३३ धावांची नाबाद खेळी करून टीम इंडियाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
-
टीम इंडियाच्या फिरकीपटूंना आयर्लंडच्या फलंदाजांना चाप लावण्यात यश आले.
-
शिखर धवनने आपल्या खेळीत पाच उत्तुंग षटकार लगावले.
-
मध्यमगती गती गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी करणारा आयर्लंड संघ फिरकी गोलंदाजीवर पूर्णपणे निष्प्रभ ठरला.
-
जॉन मूनीने शिखर धवनचा झेल सोडला तेव्हाचा क्षण.
-
धवनने विश्वचषकातील दुसरे शतक ठोकले.
-
टीम इंडियाच्या चाहत्यांचा जल्लोष.

५ एप्रिल पंचांग: दुर्गाष्टमीला कोणत्या राशीवर होणार माता लक्ष्मीची अपार कृपा; कोणाच्या पदरी पडणार सुख, शांती आणि धन; वाचा तुमचे राशिभविष्य