-
लांबचा प्रवास सुखकारक आणि आनंदमयी व्हावा म्हणून महारस्त्यावरील दुभाजकावर फुलझाडे लावलेली असतात. दुभाजकावरील फुलझाडांमुळे रस्त्याला सौदर्य प्राप्त होते आणि या सुशोभित रस्त्यांमुळे शहराच्या सौंदर्यातदेखील भर पडते. परंतु डोंबिवली शिळफाटा महारस्त्यावरील दुभाजकाच्या नशिबी घाणीचे साम्राज्य आले आहे. रस्त्याच्या दुभाजकावर फुलझाडाच्या तुटलेल्या कुंड्या आणि पसरलेली घाण पाहायला मिळते. (छाया – दीपक जोशी)
-
सेशेल्स देशाच्या दौऱयावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेथील कोस्टल रडार यंत्रणेचे उदघाटन केले. यावेळी किनारपट्टीचे सौंदर्यपाहून मोदींना फोटो काढण्याचा मोह आवरता आली नाही आणि मोदींनी आपल्या मोबाईल कॅमेरात निसर्गरम्य दृश्य कैद केले. (पीटीआय)
-
भारतीय हवाई दल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे एअर फोर्स शो २०१५चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध शत्रास्त्रे पाहण्याची संधी सामान्यांना उपलब्ध झाली आहे. (छाया- पीटीआय)(छाया- प्रशांत नाडकर)
-
स्वाईन फ्लूच्या समस्येला राज्य सरकार गांभीर्याने घेत नसल्याची घोषणाबाजी करत विरोधकांनी बुधवारी विधानसभेबाहेर सरकारचा निषेध व्यक्त केला.(छाया- प्रशांत नाडकर)
-
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशानामुळे खासदारांच्या गाड्यांनी संसदेचा परिसर अशाप्रकारे गजबजून गेला होता. (छाया- पीटीआय)
कल्याणमध्ये राहणाऱ्या माधुरी आघारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून छोटय़ा गुढी बनवण्याचा उपक्रम सुरू केला असून जानेवारीपासून सुरू होणारा हा उपक्रम मार्चपर्यंत चालतो. १५० ते १ हजार रुपये किमतीच्या गुढय़ांची विक्री त्यांच्याकडून केली जात असून लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी आघारकर यांच्याकडून गुढी घेतली आहे. (छाया-दीपक जोशी) -
भारतीय हवाई दल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे एअर फोर्स शो २०१५चे आयोजन करण्यात आले आहे. (छाया- पीटीआय)
-
मुंबईतील तापमानाचा पारा आता चढायला सुरू झाला असून मुंबईकरांना आता उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरात घरांमध्ये वापरण्यात येणारी पाण्याची मडकी बनविण्याचे काम वेगात सुरू आहे. (छाया- अमित चक्रवर्ती)

‘एमपीएससी’ची राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली जाणार ? आयोग घेणार ‘हा’ निर्णय