-
श्रीलंकेला सापडलेल्या कुमार संगकारा नामक कोहिनूर हिऱ्याची चमक डोळे दिपवणारीच ठरत आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग चार शतकांचा विश्वविक्रम रचत त्याने क्रिकेट जगताला आपल्यातील गुणवत्तेचे सर्वोत्तम प्रदर्शन केले.
-
दिलशानने १० चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १०४ धावांची खेळी साकारत संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
-
रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला पहिला धक्का २१ धावांवरच बसला. पण त्यानंतर मात्र नजाकतभऱ्या फटक्यांच्या आतषबाजीने मैदान दणाणून गेले.
-
गोलंदाजीचे कुठलेही दडपण न घेता संगकारा आणि दिलशान यांनी मुक्तपणे आपल्या पोतडीतील फटक्यांचा नजराणा पेश केला.
-
स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात संगकाराने झळकावलेले शतक, त्याला तिलकरत्ने दिलशानची मिळालेली सुयोग्य शतकी साथ आणि कर्णधार अँजेलो मॅथ्यूजच्या जलद अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने ३६३ धावांचा डेंगर उभारला
-
या विजयासह श्रीलंकेने गुणतालिकेत ‘अ’ गटात दुसरे स्थान पटकावले आहे.
-
संगकाराच्या साथीने दिलशानला देखील चांगला सुर गवसला आहे.
-
शतकी भागीदारी रचण्यात संगकारा आणि दिलशान यांनी दुसरे स्थान पटकावले असून, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली हे अव्वल स्थानावर आहेत.
-
श्रीलंकेने स्कॉटलंडचा डाव १९८ धावांवरच संपुष्टात आणला.
-
आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा डाव १९८ धावांमध्ये संपुष्टात आला.
-
स्कॉटलंडची गोलंदाजी श्रीलंकेच्या फलंदाजांसमोर पूर्णपणे निष्प्रभ ठरली.
-
फलंदाजीसह दिलशानने सामन्यात आपल्या गोलंदाजीनेही सर्वांना प्रभावित केले.
-
लसिथ मलिंगाच्या भेदक माऱयासमोर स्कॉटलंडचे फलंदाज चाचपडताना दिसले.
-
लसिथ मलिंगा आणि न्युवान कुलसेकरा यांनी अचूक मारा करत स्कॉटलंडचा अर्धा संघ गारद केला,
-
आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील अखेरचा विश्वचषक खेळणाऱया संगकाराची यंदाच्या विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी आहे.
-
संगकाराने ९५ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर १२४ धावांची अप्रतिम खेळी साकारली.
-
या दमदार विजयासह श्रीलंकेने विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.
-
श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडची ३ बाद ४४ अशी स्थिती होती. पण त्यानंतर फ्रेडी कोलमन (७०) आणि प्रेस्टन मोमसेन (६०) यांनी अर्धशतके झळकावत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यामध्ये ते अपयशी ठरले.

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक