-
झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात सुरेश रैनाने साकारलेल्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरीत सलग सहावा विजय साजरा केला.
-
रैनाने आपल्या नजाकती फटक्यांनी १०४ चेंडूत ९ चौकार आणि ४ खणखणीत षटकार ठोकून नाबाद ११० धावा ठोकल्या. तर, धोनीने कर्णधारी खेळी करत रैनाला साथ देत नाबाद ८५ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
-
दोघांनीही धावा जोडत १९६ धावांची अखंड भागीदारी रचली आणि संघाला विजयश्री मिळवून दिला.
-
रैनाने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.
-
मोहित शर्माने सामन्यात तीन विकेट्स घेतल्या.
-
संघाच्या बिकट परिस्थितीत कर्णधार धोनी आणि सुरेश रैनाने सुरूवातीला संयमी फलंदाजी करत मैदानात जम बसवला
-
सुरूवातीला संयमी फलंदाजी करून मैदानात जम बसलवल्यानंतर धोनीने आपल्या फटकेबाजीचे रंग दाखवण्यास सुरूवात केली.
-
रैनाला झिम्बाव्बेविरुद्धच्या सामन्यात चांगलाच सुर गवसला होता.
-
धोनीने अखेरपर्यंत थांबून नाबाद ८५ धावांची खेळी केली आणि संघाला विजयश्री मिळवून दिला.
-
-
-
-
शिखर धवन अवघ्या ४ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर विराट आणि अजिंक्यने अर्धशतकी भागीदारी रचून संघाला सावरण्यास सुरूवात केली.
-
गरज नसलेल्या चेंडूवर धाव घेण्याच्या नादात रहाणे १९ धावांवर धावचित झाला
-
-
झिम्बाब्वेच्या चिभाभा, मसाकाझा या सलामीजोडीला उमेश यादव आणि मोहम्मद शमीने स्वस्तात बाद केले.
-
कोहली ३८ धावांवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला.
-
सामन्याचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय टीम इंडियासाठी सुरूवातीला यशस्वी ठरताना दिसला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर झिम्बाब्वेच्या तीन फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडले.
-
मोहित शर्मानेही ११ व्या षटकात टीम इंडियाला तिसरे यश मिळवून दिले. मात्र, सध्या दमदार फॉर्मात असलेल्या ब्रेण्डन टेलरने संघाचा डाव सावरत विल्यम्सच्या साथीने जोरदार फटकेबाजीला सुरूवात केली
-
दोघांनीही टीम इंडियाच्या फिरकीपटूंचा समाचार घेतला
-
अखेरच्या षटकांत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली.
-
शिखरने सुरूवातीला संयमी फलंदाजी केली.
-
आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. भारतीय संघाने सलामीवीर जोडी स्वस्तात गमावली. रोहित शर्मा १६ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला तर, शिखर धवन अवघ्या ४ धावांवर त्रिफळाचीत झाला.
-
-
-
मसाकाझाने झेल सोडून रैनाला जीवनदान दिले.
-
रोहित शर्माचा झिम्बाब्वेच्या सिंकदर रजाने सुरेश झेल टीपला.
-
ब्रेन्डन टेलरच्या झंझावाती १३८ धावांच्या जोरावर झिम्बाब्वेने टीम इंडियासमोर २८८ धावांचे आव्हान उभारले होते. हे आव्हान टीम इंडियाने सहा विकेट्स राखून ४८ व्या षटकात गाठले.
-
विश्वचषक स्पर्धेत संघासाठी सलग १० विजय प्राप्त करून देणारा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीची नोंद झाली

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा