‘मेट्रो-३’च्या विरोधात शिवसेनेने बुधवारी पुकारलेल्या ‘गिरगाव बंद’मध्ये काँग्रेसनेही उडी घेतली होती. (छाया- केविन डिसोझा) मेट्रो-३ प्रकल्पासाठी घर गमवावे लागणाऱ्या गिरगावकरांनी बुधवारी राजकीय पक्षांच्या सहाय्याने गिरगाव बंद पुकारला होता. (छाया- केविन डिसोझा) -
स्थानिकांनी आधी पुनर्वसन, नंतरच प्रकल्प असे ठणकावत सायंकाळपर्यंत गिरगाव बंदची हाक दिली. (छाया- केविन डिसोझा)
-
गिरगावकरांनी बंदला चांगला प्रतिसाद दिला असून चिराबाजार, गिरगाव, ग्रॅण्ट रोड रहिवासी बचाव कृती समिती, स्थानिक व्यापारी व गणेशोत्सव मंडळांनीही पाठिंबा दिला आहे. (छाया- केविन डिसोझा)
शिवसेनेच्या आजच्या बंदमध्ये स्थानिक आणि व्यापारीही सहभागी झाले होते. (छाया- केविन डिसोझा) -
मेट्रो-३ प्रकल्पाला विरोधकरत पुकारण्यात आलेल्या ‘गिरगाव बंद’ला गिरगावकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद.
गिरगावकरांचे तेथेच पुनर्वसन करावे अथवा ‘मेट्रो-३’ अन्य मार्गाने वळवावी. गिरगावकरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने शिवसेनेने बुधवारी पुकारलेल्या ‘गिरगाव बंद’मध्ये काँग्रेसही सहभागी झाली.(छाया- केविन डिसोझा) -
नवी दिल्लीमध्ये भुयारी मेट्रो रेल्वे उभारण्यात आली असून या प्रकल्पासाठी एकही घर पाडावे लागले नाही. पण गिरगावातील रहिवाशांची घरे उद्ध्वस्त करून ‘मेट्रो-३’ प्रकल्प राबविण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. (छाया- केविन डिसोझा)
गिरगावकरांचे तेथेच पुनर्वसन करावे अथवा ‘मेट्रो-३’ अन्य मार्गाने वळवावी. गिरगावकरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने शिवसेनेने बुधवारी पुकारलेल्या ‘गिरगाव बंद’मध्ये काँग्रेसही सहभागी झाली.(छाया- केविन डिसोझा) -
यावेळी आंदोलनात महिलाही मोठ्याप्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. (छाया- केविन डिसुझा)
-
मेट्रो- ३ मुळे बाधित होणाऱ्या लोकांना सध्याच्या घरांपेक्षा दुप्पट क्षेत्रफळाची घरे देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.(छाया- केविन डिसोझा)

“ही फक्त गुढीपाडव्याला दिसते..” मुंबईच्या या सुंदर तरुणीची सोशल मीडियावर एकच चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल