-
श्रीलंकेचे आव्हान सहज फोडून काढत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत दिमाखात प्रवेश केला.
-
श्रीलंकेच्या फलंदाजांनी द.आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर अक्षरश: लोटांगण घातले.
-
विजयी आनंद साजरा करताना डेल स्टेन आणि अॅबॉट.
-
हशिम अमला यावेळी स्वस्तात बाद झाला.
-
हशिम आमला झेल.
-
द.आफ्रिकेच्या जे.पी.ड्युमिनीने यावेळी हॅट्ट्रिक घेतली.
-
ड्युमिनीने यावेळी आपल्या गोलंदाजीने उपस्थितांना प्रभावित केले.
-
ताहीरच्या फिरकी जाळ्यात श्रीलंकेचे चार फलंदाज फसले.
-
द.आफ्रिकेच्या फिरकीपटूंसमोर फलंदाजी करताना श्रीलंकेच्या फलंदाजांची पाचावर धारण बसली.
-
ड्युमिनीचा जल्लोष.
-
आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेचा डाव १३३ धावांत गुंडाळला.
-
लंकेचे हे माफक आव्हान द.आफ्रिकेने केवळ एक विकेट गमावून १८ व्या षटकात गाठले.
-
हॅट्ट्रिक मिळविल्यानंतर आनंद व्यक्त करताना ड्युमिनी.
-
झेल टीपताना रोसू.
-
विजयी जल्लोष साजरा करताना द.आफ्रिकेचे खेळाडू
-
कर्णधार मॅथ्यूज देखील डाव सावरू शकला नाही ड्युमिनीने ३३ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मॅथ्यूजला १९ धावांवर बाद केले. त्यानंतरच्या आपल्या पुढील षटकात पहिल्या दोन चेंडूवर कुलसेकरा आणि थिसारा परेराला माघारी धाडून जे.पी.ड्युमिनीने हॅट्ट्रिक साजरी केली.
-
उत्तम सांघिक कामगिरीच्या बळावर द.आफ्रिकेने श्रीलंकेवर ९ विकेट्सने विजय मिळवला.
-
श्रीलंकेच्या डावाची सुरूवातच निराशाजनक झाली. द.आफ्रिकेच्या भेदक माऱयाने सुरूवातीलाच दोन धक्के दिले.
-
तिलकरत्ने दिलशानला स्टेनने स्वस्तात माघारी धाडले
-
लसिथ मलिंगाची गोलंदाजी यावेळी निष्प्रभ ठरली.
-
श्रीलंकेचे फलंदाज माघारी परतताना.
-
-
श्रीलंकेच्या गोलंदाजांना द.आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखण्यात अपयश आले.
-
क्विंटन डी कॉकने दमदार फटकेबाजी केली.
-
आफ्रिकेकडून सलामीवीर क्विंटन डी कॉक याने ७८ धावांची नाबाद खेळी केली.
-
फॅफ ड्युप्लेसिसचे अभिनंदन करताना कुमार संगकारा.
-
अखेर ३७ व्या षटकात श्रीलंकेचा आधारवड कोसळला. संगकारा ४५ धावा करून झेलबाद झाला.
-
इमरान ताहीरने २६ धावा देऊन ४ विकेट्स मिळवल्या
-
संगकाराने श्रीलंकेच्या अखेरच्या खेळाडूपर्यंत झुंझ दिली परंतु, त्याला अपेक्षित साथ मिळू शकली नाही.
-
इमरान ताहीर सामन्याचा शिल्पकार ठरला. ताहीरने ४ विकेट्स घेतल्या.
-
आफ्रिकेकडून सलामीवीर क्विंटन डी कॉक याने ७८ धावांची नाबाद खेळी केली तर, फॅफ ड्यु्प्लेसिसने २१ धावांचे योगदान दिले. हशिम अमला १६ धावांवर झेलबाद झाला.
-
या विजयासह द.आफ्रिकेने चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”