-
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील अखेरच्या सामन्यात फलंदाजीसाठी वानखेडेच्या मैदानात आला तेव्हाचा हा अविस्मरणीय क्षण..(छाया- एसएफवॉलपेपर)
-
फिरोजशहा कोटला मैदानात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताच्या फिरकीपटू अनिल कुंबळेने १० विकेट्स घेऊन नोंदविलेल्या विक्रमाचा विसर होणे अशक्यच.
-
श्रीलंकेतील निसर्गसुंदर गॉल स्टेडियम त्सुनामीच्या तडाख्यामुळे उध्वस्त झाले तेव्हा..(छाया- एपीआयश्रीलंकन)
-
२००७ सालच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात फ्लिंटॉफसोबत झालेल्या बाचाबाचीनंतर टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज युवाराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सहा चेंडूत ठोकलेले सहा खणखणीत षटकार. (छाया-ट्विटर)
-
१९८३ सालच्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजचा अखेरचा फलंदाज बाद झाल्यानंतर पहिल्यांदा विश्वचषकावर शिक्कामोर्तब झाल्याचा भारतीय संघाच्या चाहत्यांना अनावर झालेला आनंद.
-
वानखेडेवर भारतीय संघावर मात केल्यानंतर फ्लिंटॉफने आपले टी-शर्ट काढून आनंद व्यक्त केला होता. सौरव गांगुलीने सात महिन्यांनंतर लॉडर्सच्या मैदानात इंग्लंडला धूळ चारून याचा वचपा काढला.
-
भारत आणि ऑस्ट्रेलियातील फिरोजशहा कोटला मैदानात झालेल्या एका कसोटी सामन्यात अचानक मधमाश्यांनी हल्ला चढवल्याने सर्व खेळाडूंसकट पंचांनाही लोटांगण घालावे लागले होते. (छाया- वर्डप्रेस)
-
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४२४ धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने यशस्वी पाठलाग करत नवा विश्वविक्रम रचला.
-
८०च्या दशकात असा होत असे..’टी-ब्रेक’ (छाया- क्रिकइन्फो)
-
क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉडर्स स्टेडियमला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या खास सामन्यात क्रिकेटमधील दिग्गजांचा समावेश करण्यात आला होता.
-
दिवंगत आंतरराष्ट्रीय पंच डेव्हिड शेफर्ड १११ किंवा त्या पटीत येणारी धावसंख्या (उदा. २२२, ३३३ )फलकावर झळकल्यास एक छोडी उडी घेत असत.
-
ऑस्ट्रेलियावर मात करत वेस्ट इंडिजचे कर्णधार क्लाइव्ह लॉईड यांनी १९७५ सालचा पहिला क्रिकेट विश्वचषक उंचावला तेव्हाचा अविस्मरणीय क्षण
-
उसळता चेंडू आदळल्याने जीव गमावावा लागलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ४०८ व्या कसोटी खेळाडू म्हणून नोंद असलेल्या युवा क्रिकेटपटू फिल ह्युजेसला कर्णधार स्टीव्ह स्मिथने शतक ठोकून श्रद्धांजली वाहिली.
-
मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर १०८१ साली रंगलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला विजयासाठी एका चेंडूत ६ धावांची गरज असताना ऑस्ट्रेलियाचे कर्णधार ग्रेग चॅपेल यांना गोलंदाजाला अंडरआर्म चेंडू टाकण्यास सांगितले आणि स्टेडियमवर एकच हास्यकल्लोळ झाला.
-
क्रिकेटसुर्य डॉन ब्रॅडमन आपल्या कारकीर्दीतील अखेरच्या सामन्यात शून्यावर बाद झाले. विशेष म्हणजे, ब्रॅडमन यांची फलंदाजी सरासरीने शंभरी गाठण्यास अवघ्या चार धावांची आवश्यकता होती. परंतु, शून्यावर बाद झाल्याने ब्रॅडमन यांची फलंदाजी सरासरी ९९.९४ इतकी राहिली. (Source: independent)
-
१९९९ सालच्या विश्वचषकाच्या उपांत्यफेरीतचा दरवाजा खुला होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला अवघ्या एका धावेची गरज होती. परंतु, अखेरच्या फलंदाज धावचीत बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने द.आफ्रिकेच्या स्वप्नांचा चुराडा केला.
-
डेनिस लिलीच्या गोलंदाजीवर मारलेल्या बचावात्मक फटक्यावर धाव घेताना जावेद मियाँदाद आणि लेली एकमेकांना आदळले. याचे रुपांतर बाचाबाचीत झाले आणि मियाँदाद अनावर होऊन अशाप्रकारे गोलंदाजावर धावून गेले.
-
वेस्ट इंडिजचा शीवनरेन चंद्रपौल आणि जॅकोब्ज दोन्हीही फलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने दोन्ही फलंदाजांसाठी ‘रनर्स’ बोलाविण्यात आले.
-
१९७७ साली न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चक्क ९ स्लिपचे क्षेत्ररक्षण रचले होते.
-
१९९९ साली पुन्हा एकदा कित्ता गिरवत हरारे स्टेडियमवर झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ९ स्लिप्सचे क्षेत्ररक्षण ठेवले होते.
-
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने तब्बल ४०० धावा ठोकून विश्वविक्रम रचला.
-
चपळ क्षेत्ररक्षणासाठी ओळखल्या जाणाऱया दक्षिण आफ्रिकेच्या जॉन्टी रोड्सने १९९२ च्या विश्वचषकात पाकिस्तानच्या इंजमामला धावचीत करण्यातसाठी त्रिफळांच्या दिशेने घेतलेली झेप.
-
आपल्या अखेरच्या कसोटी सामन्यावेळी भावूक झालेल्या सचिनने आपली कर्मभूमी वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीला केलेला नमस्कार हा देखील एक अविस्मरणीय क्षण आहे.
-
१९९९, २००३ आणि २००७ सालच्या विश्वविजेतेपदावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवत जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली.
-
केवळ ३१ चेंडूत शतक ठोकून नवा विक्रम करणाऱया दक्षिण आफ्रिकेच्या ए.बी.डीव्हिलियर्स समोर वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल देखील नतमस्तक झाला.
-
लॉडर्स स्टेडियमला २०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या खास दिग्गजांच्या सामन्यात युवराज सिंगचाही समावेश करण्यात आला होता. सचिनच्या गोलंदाजीवर फलंदाजी करणारा युवाराज षटक संपल्यानंतर सचिनसमोर नतमस्तक झाला.
-
इंग्लंडचे माजी कर्णधार टोनी ग्रेग यांना त्रिफळांवर त्यांची खास टोपी ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली.
-
वानखेडेवर टीम इंडियाची २८ वर्षांची प्रतिक्षा संपली आणि टीम इंडियाने विश्वचषक उंचावून सचिनचे स्वप्न पूर्ण केले.
-
आपला सहकारी लॅरी गोम्स ९६ धावांवर खेळत असल्यामुळे हाताला दुखापत झाली असूनही वेस्ट इंडिजचा माल्कम मार्शल फलंदाजीसाठी मैदानात दाखल झाला. यावेळी मार्शलने चक्क एका हाताने फलंदाजी केली. गोम्सला आपले शतक पूर्ण करता आले आणि मार्शलनेही एक चौकार ठोकला.
-
फिरकीपटू शेन वॉर्न, क्रिकेटवीर सर डॉन ब्रॅडमन आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर.
-
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडमध्ये रंगलेल्या एका चुरशीच्या सामन्यात इंग्लंडने अवघ्या २ धावांनी विजय साजरा केला. क्रिकेट बद्दलची आत्मियता यावेळी फ्लिंटॉफकडून ब्रेटलीच्या सांत्वनातून दिसून आली. त्यावेळी फ्लिंटॉफ आणि ब्रेट ली कट्टर प्रतिस्पर्धी मानले जात होते.
-
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना अनिर्णीत राखण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीला उतरून ८.२ षटके खेळणे परिहार्य होते. मग, यावेळी द.आफ्रिकेचा कर्णधार ग्रेम स्मिथ बोटाला दुखापत झाली असतानाही फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता.
-
भारतीय संघाचे कसोटीवीर गुंडप्पा विश्वनाथ यांनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले आणि याचा प्रतिस्पर्धी इंग्लंड संघातील टोनी ग्रेग यांनीही विश्वनाथ यांना उचलून आनंद साजरा केला होता.
-
ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज डेनिस लिली एका सामन्यात चक्क ‘कॉम्बॅट’ नावाची अॅल्युमिनिअमची बॅट घेऊन फलंदाजीला आले होते. त्यावेळी पंचांची सामना थांबवून परवानगी नाकारली होती.
-
वेस्ट इंडिजविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी सामन्यात भारताचे माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी आपल्या जबड्याला दुखापत झाली असूनही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि १४ षटके टाकली. कुंबळे यांनी यावेळी ब्रायन लाराला बाद करून भारतीय संघाला महत्त्वापूर्ण यश मिळवून दिले होते.
-
१९९६ च्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानच्या आमिर सोहेलने भारताच्या व्यंकटेशप्रसादला दमदार चौकार ठोकल्यानंतर आपल्या बॅटने आव्हानात्मक इशारा केला होता. (Source: oddipackd)
-
आव्हान दिल्यानंतर लगेच पुढच्याच चेंडूवर व्यंकटेश प्रसादने त्रिफळा उडवून सोहेलला चालते केले.
-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शतकांचे शतक गाठले तेव्हाचा क्षण. (Source: ideastream)
-
पाकिस्तान दौऱयावर असताना श्रीलंकेच्या संघाला दहशतवादी हल्ल्याला सामोरे जावे लागले होते. यावेळी लाहोरच्या स्टेडियममधूनच श्रीलंकेच्या खेळाडूंची थेट मायदेशी हेलिकॉप्टरमधून रवानगी करण्यात आली होती. (Source: zimbio)
-
लॉडर्सच्या स्टेडियमवर ३ ऑगस्ट १९७६ साली पहिला-वहिला महिलांचा एकदिवसीय क्रिकेट सामना खेळवला गेला तेव्हाचा क्षण. (Source:cricketcountry)
-
इंग्लंडच्या इयान बोथमने १९८१ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात १४९ धावांची मॅच विनिंग खेळी साकारली होती. या महत्त्वपूर्ण झंझावाती खेळीनंतर मुक्तछंदीपणे सिगार ओढतानाची बोथमची छबी. (Source: espncricinfo)
-
२००७ च्या विश्वचषकात भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात बर्म्युडा संघाच्या ड्वेन लेवरॉकने टीपलेला रॉबीन उथप्पाचा झेल. (Source: dailymail)
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन संघांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेल्या काही मोजक्या खेळाडूंपैकी केपलर वेसल्सने ऑस्ट्रेलियासाठी २१ कसोटी सामने खेळले होते. पुढे द.आफ्रिकेने १९९१ साली केपलरवरील बंदी उठवल्यानंतर १९९२ च्या विश्वचषकात आफ्रिकेकडून खेळताना केपलरने ८१ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान देऊन सुरूवातीच्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
-
क्रिकेटवीर सर. डॉन ब्रॅडमन यांच्या पुतळ्यासमोर मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकरचे टीपेलेले हे छायाचित्र युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान ठरणारे आहे.

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार