रूळावरून खाली घसरलेल्या डब्यांमध्ये जे प्रवासी सीटच्यामध्ये अडकून पडले होते, त्यांना गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. (छाया- पीटीआय) तर, गंभीर जखमी झालेल्यांना ५०,००० आणि किरकोळ जखमींना २०,००० रूपयांची मदत देण्यात येणार आहे. जखमींवर लखनौ, रायबरेली व बछरावा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (छाया- पीटीआय) -
केंद्र सरकारने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून, मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून २ लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. (छाया- पीटीआय)
शुक्रवारी सकाळी ९.३०च्या सुमारास ही घटना घडली. इंजिनाच्या चालकाने सिग्नलचे उल्लंघन केल्यामुळे इंजिन आणि त्याला लागून असलेले दोन डबे रूळ सोडून खाली उतरल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याची माहिती रेल्वेचे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी दिली. (छाया- पीटीआय) -
या अपघातात ३० जणांचा मृत्यू आणि १५० जण जखमी झाले आहेत. (छाया- पीटीआय)
-
उत्तर प्रदेशातील बछरावा रेल्वेस्थानकानजीक शुक्रवारी सकाळी देहरादून-वाराणसी जनता एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून घसरल्यामुळे भीषण अपघात झाला.

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार