-
गप्तीलने १६३ चेंडूत २४ चौकार आणि ११ खणखणीत षटकारांसह २३७ धावांची नाबाद खेळी साकारली.
-
विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या आणि अखेरच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात वेलिंग्टन स्टेडियमवरील उपस्थित प्रेक्षक चौकार आणि षटकारांच्या पावसात न्हाऊन निघाले.
-
गप्तीलच्या खेळीत नाहक पुढे जाऊन अंदाधुंदी मारलेला फटका एकही नव्हता.
-
यजमान न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टीन गप्तीलच्या वादळात वेस्ट इंडिजचे गोलंदाज जमिनदोस्त झाले.
-
गप्तीलच्या या खेळीच्या बळावर किवींनी वेस्ट इंडिजसमोर ३९४ धावांचा डोंगर उभारला.
-
गप्तीलचे अभिनंदन करताना ख्रिस गेल.
-
गप्तीलने आपल्या भात्यातील ठरावीक नजाकती फटक्यांचे दर्शन घडवत उपस्थितांना भारवून सोडले.
-
गप्तीलने १११ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
-
उपस्थितांनी गप्तीलला जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊन अभिनंदन केले.
-
गप्तीलच्या खेळीत तब्बल ११ खणखणीत षटकारांचा समावेश आहे.
-
गप्तीलचे अभिनंदन करताना फिरकीपटू व्हेटोरी.
-
त्याने लगावलेले सर्व षटकार बॅकफूटवरून सहजगत्या मारलेले विश्वासू फटके होते.
-
गप्तील विश्वचषक स्पर्धेत बाद फेरीत सर्वाधिक वैयक्तिक धावांची खेळी साकारणारा खेळाडू ठरला.
-
शतक गाठल्यानंतर गप्तीलच्या खेळीला आणखी बहर येण्यास सुरूवात झाली.
-
शतक झळकावल्यानंतर गप्तीलच्या फलंदाजीला बहर आला असून त्याने कारकीर्दीतील पहिले तर, विश्वचषक स्पर्धेत द्विशतक ठोकणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.
-
गप्तील २४ दमदार चौकार लगावले.
-
-
-
-
-
-
सामन्याचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱया न्यूझीलंडने मॅक्युलम आणि चांगल्या फॉर्मात असलेल्या विल्यम्सन या दोन महत्त्वाच्या फलंदाजांना स्वस्तात गमावल्यानंतर गप्तील आणि रॉस टेलरने संयमी खेळी करत न्यूझीलंडच्या धावसंख्येला आकार देण्यास सुरूवात केली.
-
-
-
-
-
-
-
-
टीम इंडियाच्या रोहित शर्माच्या २६४ धावांच्या विक्रमाशी बरोबरी मात्र त्याला करता आली नाही. पन्नास षटकांच्या अंती गप्तील २३७ धावांवर नाबाद राहिला.

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड