पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील हुसैनीवाला येथे सोमवारी शहीद दिनानिमित्त राष्ट्रीय हुतात्मा स्मारकामध्ये शहीद भगतसिंह, राजगुरु व सुखदेव यांना आदरांजली वाहिली. (छायाः पीटीआय) धनगर समाजाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात सोमवारी मोर्चा काढला. (छायाः गणेश शिर्सेकर) अलिबाग येथील मांडवा बंदरावर प्रवाशांच्या सोयीसाठी मेरीटाइम बोर्डाने नुकतीच तरंगत्या जेटीची उभारणी केली होती. मात्र, उदघाटनापूर्वीच उधाणाच्या लाटांमध्ये रविवारी मध्यरात्री ही जेटी बुडाली. राज्यातील ही पहिलीच तरंगती जेटी होती, हे विशेष. जेटीला क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. वांद्रे पूर्व मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी सोमवारी मुंबई काँग्रेसच्या मुख्यालयात अध्यक्ष संजय निरुपम यांची भेट घेतली. (छायाः प्रदीप कोचरेकर) इटलीच्या पियाज्जिओ समूहाची उप कंपनी असलेल्या पियाजिओ वेहिकल्सने नवे प्रवासी वाहन ‘अॅपे एक्स्ट्रा डीएलएक्स’ सोमवारी मुंबईत सादर केले. नव्या अॅपेसह कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्तिफानो पेले. (छायाः पीटीआय)
Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील ‘त्या’ नवजात जुळ्या मुलींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; पीडित कुटुंबियांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी केले जाहीर!