-
विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अटी-तटीच्या लढतीत न्यूझीलंडने चार विकेट्स आणि एक चेंडू राखून रोमांचक विजय प्राप्त केला. या विजयासह किवींनी पहिल्यांदाच स्पर्धेची अंतिम फेरी गाठून इतिहास रचला तर, द.आफ्रिकेवरील 'चोकर्स'चा शिक्का पराभवामुळे कायम राहिला. या रोमहर्षक सामन्यातील काही क्षण..
-
ग्रँट इलियट न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. डेल स्टेनच्या अखेरच्या षटकात दोन चेंडूत ५ धावांची गरज असताना इलियटने खणखणीत षटकार खेचून विजयावर शिक्कामोर्तब केले.
-
इलियटने ७३ चेंडूत नाबाद ८४ धावा ठोकल्या. तर, कोरे अँडरसनने ५८ धावांची खेळी करून महत्त्वपूर्ण योगदान दिले.
-
आफ्रिकेच्या २९८ धावांच्या तुल्यबळ आव्हानाचा पाठलाग करताना सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला.
-
पावसाच्या व्यत्ययामुळे सामना ४३ षटकांचा करण्यात आला होता. द.आफ्रिकेने ४३ षटकांमध्ये ५ विकेट्स गमावून २८१ धावा ठोकल्या. पुढे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार न्यूझीलंडसमोर २९८ धावांचे सुधारित आव्हान ठेवण्यात आले.
-
या पराभवासह द.आफ्रिकेचे पुन्हा एकदा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आले.
-
आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमने जोरदार फटकेबाजीला सुरूवात केली. मॅक्क्युलमने चौकार आणि षटकारांचा वर्षाव सुरू करत आफ्रिकेच्या डेल स्टेनचा खरपूस समाचार घेतला.
-
मॅक्क्युलमने त्याचे वैयक्तिक अर्धशतक अवघ्या २२ चेंडूत पूर्ण केले. त्याने केवळ २५ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकार ठोकत ५९ धावा कुटल्या.
-
-
-
-
कोरे अँडरसनने ५८ धावांची खेळी करून महत्त्वपूर्ण योगदान दिले.
-
-
-
-
-
-
-
फॅफ डू प्लेसिस आणि रिले रोसू यांनी संयमी फलंदाजी करत धावसंख्येला आकार देण्यास सुरूवात केली.
-
-
-
-
सामन्याचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या दक्षिण आफ्रिकेला सुरूवातीलाच दोन धक्के बसले होते.
-
-
द.आफ्रिकेची सलामीजोडी न्यूझीलंडचा तेजतर्रार गोलंदाज ट्रेंट बोल्टने स्वस्तात फोडून काढली
-
-
-
-
-
-
कर्णधार एबी डीव्हिलियर्सच्या साथीने फॅफने आपले अर्धशतक गाठले
-
-
-
-
-
-
-
-

LSG vs MI: “साधी गोष्ट आहे, संघाला…”, तिलक वर्माच्या रिटायर्ड आऊटवर हार्दिक पंड्याचं मोठं वक्तव्य, मुंबईच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?