-
१९८१ साली मेलबर्नवर झालेल्या कसोटी सामन्यात सुनिल गावसकर पंचांनी चुकीचा निर्णय दिल्यामुळे नाराज होऊन सहकारी फलंदाज चेतन चौहानसह माघारी परतले होते. भारतीय संघाचे व्यवस्थापक शाहिद दुरानी यांनी समजूत काढून चेतन चौहान यांना फलंदाजीसाठी जाण्यास सांगितले आणि वाद सोडवला. त्यानंतर गावसकर यांनी आपल्या स्पष्टीकरणात पंचांच्या निर्णयावर नाही तर, गोलंदाज डेनीस लिलीने केलेल्या आक्षेपार्ह संकेतांमुळे नाराज झाल्याचे सांगितले. (छाया- स्पोर्ट्सकिडा)
-
१९९९ वर्ष सचिन तेंडुलकर विरुद्ध ग्लेन मॅक्ग्रा असे गाजले. मॅक्ग्राच्या बाऊंसरपासून बचाव करण्यासाठी सचिन खाली बसला मात्र, चेंडू सचिनच्या खांद्यावर आदळला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पंचांकडे सचिन बाद असल्याची दाद मागितली आणि पंचांनी सकारात्मक निर्णय देखील दिला. पंचांचा हा निर्णय वादग्रस्त ठरला होता. (छाया- याहू)
-
मुंबईत २००१ साली झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या कसोटी सामन्यात राहुल द्रविडने लगावलेल्या पूल शॉटवर मायकेल स्लॅटरने झेल टीपला होता. मात्र, चेंडूचा जमिनीला स्पर्श झाला असून झेल पूर्ण झाला नसल्याच्या शक्यतेने द्रविडने मैदान सोडले नाही. पंचांनी देखील नॉटआऊट निर्णय दिल्याने स्लॅटरचा ताबा सुटला आणि त्याने द्रविडविरुध्द अर्वाच्य भाषेचा प्रयोग केला. सामन्यानंतर स्लॅटरवर कारवाई करून दंड ठोठावण्यात आला. (छाया- क्रिकइन्फो)
-
ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या २००१ सालच्या मालिकेत कर्णधार स्टीव्ह वॉ नाणेफेकीसाठी नेहमी उशीरा येत असल्याने भारतीय संघाचा कर्णधार सौरभ गांगुलीचा पारा चढला होता. आजवर सात वेळा नाणेफेकीसाठी मैदानात येण्यास मला गांगुलीची वाट पाहावी लागली असल्यामुळे २००१ सालच्या मालिकेत मुद्दाम मैदानात उशीरा येत असल्याचे खुद्द स्टीव्ह वॉ यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. दरम्यान, गांगुलीने आपल्याकडून केव्हाच मुद्दाम उशीर केला नसल्याचे सांगितले. (छाया- एसएमएच)
-
२००८ साली सिडनी कसोटीत भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि अँड्र्यू सायमंड्स यांच्यात झालेल्या बाजाबाचीचे प्रकरण चांगलेच गाजले होते. हरभजनवर अँड्र्यू सायमंड्सचा उल्लेख माकड म्हणून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. प्रकरण दोन्ही बाजूने भलतेच तापले आणि कोर्ट तसेच शिस्तपालन समितीपर्यंत गेले. हरभजनवर तीन सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय देण्यात आला होता. (छाया- विकी)
-
हरभजन आणि सायमंड्सचा वाद झालेल्या याच कसोटीत सौरव गांगुलीचा मायकेल क्लार्कने स्लिपला टीपलेला झेल वादग्रस्त ठरला होता. रिप्लेमधूनही झेल योग्य-अयोग्य असल्याचे स्पष्ट दिसत नव्हते. अशावेळी कर्णधार रिकी पॉंटींगने बोट उंचावून झेल सुयोग्य टीपला असून बाद असल्याचा संकेत दिला. पंचांनी गांगुलीला बाद घोषित केले. यावर गांगुलीने नाराजी व्यक्त करत पंचांसाठी रिकी पॉंटींगने निर्णय जाहीर करणे योग्य नसल्याचे म्हटले. (छाया- एबीसी)
-
दिल्लीत २००८ साली झालेल्या कसोटी सामन्यात दुसरी धाव घेताना गौतम गंभीर ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉटसनला भिडला. हे दृश्य कॅमेरात कैद झाले. गंभीरने या सामन्यात द्विशतक ठोकले होते मात्र, या कृतीमुळे त्याला पुढील सामन्याला मुकावे लागले होते. (छाया- द एज)
-
ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू हेडनला चालते केल्यानंतर भारताचा तेजतर्रार गोलंदाज जहीर खानने हेडनला उद्देशून आक्षेपार्ह शब्दप्रयोग केला. यावर जहीरला दंड ठोठावण्यात आला होता. (छाया- गार्डियन)
-
मोहालीमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात रिकी पाँटिंग धावचीत बाद झाल्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज जहीर खान धावत येऊन पॉटींगच्या जवळ जाऊन त्यांच्यावर हसू लागला. यावर पाँटिंग देखील प्रत्युत्तर देण्यास भारतीय संघाच्या खेळाडूंजवळ गेला तोपर्यंत पंचांनी हस्तक्षेप करून वाद जागीच मिटवला. (Source: PunjabiLokVirsa)
-
वादविवादांची यादी विराट कोहलीशिवाय पूर्ण कशी होईल? २०१२ साली सिडनी कसोटीत विराट कोहली उपस्थित प्रेकक्षांवर भलताच नाराज झाला आणि या युवा क्रिकेटपटूने प्रेक्षकांच्या दिशेने आक्षेपार्ह हावभाव केले. केलेल्या कृतीचा विराटला फटका बसला आणि त्याच्या सामन्यातील मानधनात ५० टक्क्यांची घट करण्यात आली. (छाया- द ऑस्ट्रेलियन)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक