राष्ट्रपती भवनात ‘भारतरत्न’ आणि ‘पद्म’ पुरस्कारांचे वितरण
काशी हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना करणारे स्वर्गीय मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनामध्ये प्रणव मुखर्जींच्या हस्ते मालवीय यांच्या कुटुंबियांनी हा सन्मान स्वीकारला. सोहळ्यामध्ये पद्म पुरस्कारही प्रदान करण्यात आले.