-
‘वेलकम जिंदगी’ हा चित्रपट गडद कॉमेडी प्रकारात मोडणारा चित्रपट आहे. यात केंन्द्रस्थानी आहेत दोघं. एक मुलगी जिला जगण्यात स्वारस्यच उरलेलं नाही आणि एक मुलगा, जो तिच्या लेखी जीवनाचा अर्थ बनून जाईल.
-
मीरा एक मीडिया प्रोफेशनल आहे आणि या क्षणाला तिचं आयुष्य एका नं सुटणाऱ्या कोड्यासारखं झालय. सारेच अपल्याला फसवतायतसं तिला वाटतं.
-
या सर्वातून मुक्त होण्यासाठी मीराला एकच मार्ग दिसतो, तो म्हणजे आत्महत्येचा!
-
‘हॅपी एण्डींग सोसायटी’ नावाची संस्था चालवविणारा आनंद प्रभू मीराला वाचवतो.
-
मीराच्या अचानक बेपत्ता होण्याने तिचे वडील डॉ. राजवाडे हवालदील होतात आणि तिच्या शोधात जंग जंग पछाडतात.
-
पुढे काय होतं मीरा आपल्या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवू शकते का? मीराला आपल्याबरोबर आणण्यात आनंदचा काही छूपा हेतू तर नसतो? डॉक्टर राजवाडेंची मीराशी भेट होते का? ‘हॅपी एण्डींग सोसायटी’ या संस्थेच काय रहस्य असतं? या प्रश्नांची उकल होण्यासाठी ‘वेलकम जिंदगी’ हा चित्रपट पाहायला हवा.
-
विनोदी धाटणीचा हा चित्रपट प्रेक्षकांना हसवत ठेवण्याबरोबर त्याच्यातील आशय संपन्नतेमुळे प्रेक्षकांच्या स्मरणातदेखील राहील असा दावा चित्रपटकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
-
२६ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन उमेश घाडगे यांनी केले असून, चित्रपटात स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, डॉ. मोहन आगाशे, प्रशांत दामले, भारती अचरेकर, पुष्कर श्रोत्री, मुरली शर्मा, उर्मिला कानिटकर-कोठारे इत्यादी कलाकारांच्या भूमिका आहेत. तर महेश मांजरेकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा