-
दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटाच्या स्पेशल स्र्किनिंगचा कार्यक्रम रविवारी पार पडला. माध्यमांच्या कॅमेऱ्यापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करणारे रणबीर कपूर आणि कतरिना कैफ हे प्रेमीयुगूल यावेळी मात्र खुल्लम खुल्ला कॅमेऱ्याला सामोरे गेले. अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची प्रेयसी कतरिना कैफ लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. येत्या वर्षभरात आपण लग्न करणार असल्याचे खुद्द रणबीर कपूरने जाहीर केले आहे. (छाया – वरिंदर चावला)
-
अतिशय आनंदी मूडमध्ये अभिनेत्री कतरिना कैफ. (छाया – वरिंदर चावला)
-
कतरिना आणि रणबीरची एक झलक. (छाया – वरिंदर चावला)
-
कतरिनाने काळा टॉप, जिन्स आणि लाल रंगाचा लांब कोट असा पोशाख परिधान केला होता. (छाया – वरिंदर चावला)
-
रणबीरने चौकटींचा शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. गेल्या अनेक वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची प्रेयसी कतरिना कैफ लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. खुद्द रणबीर कपूरने तशी माहिती दिली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मी आणि कतरिना येत्या वर्षभरात लग्न करणार असल्याचे रणबीरने सांगितले. यंदाच्या वर्षात आम्हा दोघांचे वेळापत्रक खूपच व्यस्त होते. त्यामुळे लग्न करण्यासाठी वेळ मिळाला नाही. मात्र, येत्या वर्षभरात लग्न करण्याचा निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतल्याचे त्यांनी सांगितले. (छाया – वरिंदर चावला)
-
कल्की कोचलीन आपल्या गुलशन देवैह या मित्रासह कार्यक्रमाला उपस्थित होती. (छाया – वरिंदर चावला)
-
‘बॉम्बे वेल्वेट’चा दिग्दर्शक अनुराग कश्यप मुलगी अलियाहबरोबर आला होता.
-
अभिनेत्री आणि गायिका मोनिका डोंगरानेसुध्दा कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. (छाया – वरिंदर चावला)
-
श्रध्दा कपूरचा भाऊ सिध्दांत देखील या स्पेशल स्र्किनिंगला उपस्थित होता.
-
राहुल भट आणि दिग्दर्शक सुधिर मिश्रा एकत्र आले होते. (छाया – वरिंदर चावला)
-
निर्माता आणि छोट्या पडद्यावरील सूत्रसंचालक सिध्दार्थ बासू आपली पत्नी अंकीता कौलसह उपस्थित होता. (छाया – वरिंदर चावला)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल