-
गेल्या ४२ वर्षांपासून कोमामध्ये असलेल्या केईएम रुग्णालयातील परिचारिका अरुणा शानबाग यांचे सोमवारी सकाळी निधन झाले.(छाया- केव्हिन डिसुझा)
-
सोमवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.(छाया- केव्हिन डिसुझा)
-
गेल्या काही दिवसांपासून अरुणा यांच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार होत होते.(छाया- केव्हिन डिसुझा)
-
केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे आणि अरुणाच्या भाच्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
-
शानबाग यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
अरुणा शानबाग यांचे अखेरचे दर्शन (छाया- केव्हिन डिसुझा)
-
शानबाग यांच्या अंत्ययात्रेला अलोट गर्दी. (छाया- केव्हिन डिसुझा)
-
शानबाग यांच्याबद्दलची परिचारिकांची आत्मीयता तसूभरही कमी झालेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या जाण्याने आज केईएममधील सारे वातावरण शोकाकूल झाले आहे. (छाया- केव्हिन डिसुझा)
-
शानबाग यांच्या जाण्याने संपूर्ण रुग्णालयातील प्रत्येक कर्मचारी शोकाकुल झाला होता. (छाया- केव्हिन डिसुझा)
-
अरुणा शानबाग अमर रहे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.(छाया- केव्हिन डिसुझा)
-
चार दिवसांपूर्वी अरुणा यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. या वेळी त्यांच्या काही चाचण्या केल्यावर त्यांना न्युमोनिया झाल्याचे निदान झाले. त्यांच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होऊ नये, म्हणून त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. (छाया- केव्हिन डिसुझा)
-
यावेळी केईएम रुग्णालयातील परिचारिका आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (छाया- केव्हिन डिसुझा)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल