-
सुरुवात कशीही झाली तरी मोक्याच्या क्षणी जो बाजी मारतो, त्यालाच सिकंदर म्हणतात आणि हेच मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमध्ये दाखवून दिले.
-
अंतिम फेरीत चॅम्पियनसारखा खेळ करत मुंबईने दुसऱ्या आयपीएल जेतेपदाला गवसणी घातली.
-
मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही, त्यांनी सलामीवीर पार्थिव पटेलला (०) झटपट गमावले. पण पहिल्या धक्क्याचे कोणतेही दडपण न घेता रोहित आणि सिमन्स यांनी मुक्तपणे फटकेबाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले.
-
कर्णधार रोहित शर्मा आणि लेंडल सिमन्स यांच्या अर्धशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २०२ धावांपर्यंत मजल मारली.
-
आयपीएल-८ चे चॅम्पियन्स.
-
सामना जिंकल्यानंतरचा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे सेलिब्रेशन.
-
अखेरच्या सामन्यात आपल्या स्वप्नवत कामगिरीचा नजराणा पेश करत मुंबईने विजेतेपदाला गवसणी घातली.
-
मुंबईचा विजयी कारनामा.
-
चषक स्विकारताना संघनायक रोहित शर्मा.
-
-
रोहित आणि सिमन्स यांनी मुक्तपणे फटकेबाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले होते.
-
मुंबईच्या २०३ धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. सुरुवातीला २२ धावांवर पहिला धक्का बसल्यानंतर चेन्नईच्या धावसंख्येला खिळ बसली.
-
‘दुनिया हीला देंगे’ म्हणत मुंबई इंडियन्सने अखेरच्या सामन्यात चॅम्पियन्ससारखा खेळ केला.
-
चषक स्विकारल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.
-
मुंबईने कोलकाताच्या इडनगार्डनवर चेन्नई सुपरकिंग्जला तब्बल ४२ धावांनी धूळ चारली.
-
मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू रिकी पॉंटींगला पोलार्डने उचलून घेत विजयाचा जल्लोष साजरा केला.
-
विजयाचा जल्लोष साजरा करताना मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, रिकी पॉंटींग आणि फिरकीपटू हरभजन सिंग.
-
यापूर्वी मुंबईने २०१३ साली स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?