-
सध्या देशभरात उष्णतेची प्रचंड लाट असून आणखी काही दिवस सामान्यांना उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक राज्यात लोक आपापल्यापरीने उकाड्यावर मात करण्यासाठी मार्ग शोधून काढत आहेत. (छाया- एपी)
हैदराबादच्या जलविहार वॉटरपार्कमध्ये लोक जलक्रीडेचा आनंद लुटताना. (छाया- एपी) -
उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढतच जात असल्याचे सध्या चित्र आहे. या उन्हावर मात करण्यासाठी आणि पोहण्याचा स्वच्छंद आनंद घेण्यासाठी बाणगंगा नदीत उडी मारताना तरुण. (छायाः गणेश शिर्सेकर)
मुंबईतील वाढत्या उकाड्यामुळे रस्त्यावरील थंड पेये आणि बर्फाचे गोळे विकणाऱ्या गाड्यांकडे मुंबईकरांचे पाय आपसुकच वळत आहेत. (छाया- प्रदीप दास) मुंबईतील वाढत्या उकाड्यामुळे रस्त्यावरील थंड पेये आणि बर्फाचे गोळे विकणाऱ्या गाड्यांकडे मुंबईकरांचे पाय आपसुकच वळत आहेत. (छाया- प्रदीप दास) मुंबईतील वाढत्या उकाड्यामुळे रस्त्यावरील थंड पेये आणि बर्फाचे गोळे विकणाऱ्या गाड्यांकडे मुंबईकरांचे पाय आपसुकच वळत आहेत. (छाया- प्रदीप दास) -
अलहाबाद येथील यमुना नदीत माणूस पोहताना टिपलेले छायाचित्र. (छाया- एपी)
-
हैदराबादमध्ये तापमानाचा पारा प्रचंड चढल्याने लोकांना छत्री घेऊनच घराबाहेर पडावे लागत आहे. (छाया- एपी)
-
हैदराबादमधील एका तलावात पाण्याशी खेळताना हा लहान मुलगा. (छाया- एपी)
उन्हापासून बचाव करण्यासाठी या माणसाने रस्त्यावरील काँक्रिटच्या पाईप्सच्या आतमध्ये विश्रांती घेताना. (छाया- एपी) -
अहमदाबादमध्ये पाण्याच्या टँकरखाली आंघोळ करताना हा माणूस. (छाया- एपी)
-
मोटारसायकलवरून कुलर वाहून नेताना हे तरूण. (छाया- एपी)
-
भारतातील इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीतील उकाडा असह्य असतो. लोकांना रात्रीच्यावेळी घरात झोपणेदेखील अशक्य झाले आहे. त्यामुळे येथील लोकांनी घरांच्या गच्चीवर झोपण्याचा पर्याय निवडला आहे. (छाया- एपी)
-
दिल्लीच्या बादशहापूर भागामध्ये रस्त्यावर राहणाऱ्या या मुली आपल्या लहान भावांना आंघोळ घालताना. (छाया- एपी)
लोक उकाड्यापासून सुटका करण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधत असताना दिल्लीतील या मजुराच्या मुलाला मात्र पंपावरून पाणी वाहून आणावे लागत आहे. (छाया- एपी) -
भारतातील इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीतील उकाडा असह्य असतो. लोकांना रात्रीच्यावेळी घरात झोपणेदेखील अशक्य झाले आहे. त्यामुळे येथील लोकांनी घरांच्या गच्चीवर झोपण्याचा पर्याय निवडला आहे. (छाया- एपी)
-
कडक उन्हात रस्त्याच्याकडेला रिक्षा उभी करून विश्रांती घेणारा रिक्षाचालक. (छाया- एपी)
कोलकाता शहरातील लहान मुले पाण्यात सूर मारताना. (छाया- एपी) -
दिल्ली परिसरातील हौदात सूर मारताना ही लहान मुले. (छाया- एपी)
-
उन्हाच्या काहिलीवर मात करण्यासाठी मुंबईतील बॅड स्टँड येथे समुद्रात जलक्रीडेचा आनंद लुटताना हा तरूण. (छाया- प्रदीप दास)
-
उन्हाच्या काहिलीवर मात करण्यासाठी मुंबईतील बॅड स्टँड येथे समुद्रात जलक्रीडेचा आनंद लुटताना हा तरूण. (छाया- प्रदीप दास)
-
जम्मू रेल्वेस्थानकावर रेल्वेगाड्या साफ करण्यासाठी असलेल्या नळावर आंघोळ करताना हा युवक. (छाया- एपी)
-
नागालँडच्या दिमापूर भागातील लहान मुले उन्हाची काहिली शमविण्यासाठी ओढ्यामध्ये सूर मारताना. (छाया- एपी)
-
हैदराबादमध्ये उकाडा असह्य झाल्याने चेहऱ्यावर पाणी ओतून घेताना एक माणूस. (छाया- एपी)
-
उन्हाळ्यामुळे ग्रामीण भागाप्रमाणेच मुंबईच्या शहरी भागातही पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. वडाळा भागातील या लहान मुलांना पाणी वाहून आणण्यासाठी अशाप्रकारचे कष्ट करावे लागत आहेत. (छाया- प्रदीप दास)
कडक उन्हाळ्यात गळा सुकल्यावर पोपटाने नळातून झिरपणा-या पाण्याने तहान भागवली. (छायाः पीटीआय) मुंबईतील वाढत्या तापमानामुळे घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी डोक्यावरून खुर्ची घेऊन जाताना एक नागरिक. (छायाः पीटीआय) -
जागतिक तापमानात वाढ झाल्यामुळे उष्णतेची लाट आणखी तीव्र होत चालली आहे. मनुष्यांसह प्राण्यांनाही या झळांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसते. जम्मूतही उन्हाचा कडाका वाढला असून नळातील पाणी पिताना ही माकडे. (छायाः पीटीआय)
-
उन्हाची काहीली सुरू असूनही त्यावर मात करत विविध रंग आणि आकारांच्या टोप्या घालून मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर फेरफटका मारण्यासाठी आलेले कुटुंब. (छाया- वसंत प्रभू)
-
नवी मुंबईत खारघर येथील धामोले गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील ग्रामस्थांना खारघर येथील ३ ते ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या सेंट्रल पार्कमधून दररोज पाण्यासाठी कडाक्याच्या उन्हात पाटपीट करावी लागत आहे. (छायाः नरेंद्र वास्कर)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल