-
बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा आज ४२ वा वाढदिवस. या निमित्ताने बिग बी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवटवरून चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांचे आभार व्यक्त करत पत्नी जयासोबतचे काही दुर्मिळ फोटो शेअर केले आहेत. (एक्स्प्रेस फोटो)
-
३ जून १९७३ साली अमिताभ आणि जया यांच्या नात्याचे विवाहात रुपांतर झाले. (एक्स्प्रेस फोटो)
-
१९७३ साली ‘जंजीर’ चित्रपटात दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते आणि याच वर्षी दोघांचा विवाह देखील झाला. चित्रपटाला मिळालेले यश साजरे करण्यासाठी अमिताभ आणि जया यांना परदेशवारीवर जाण्याची इच्छा होती. मात्र, अमिताभ यांच्या कुटुंबियांनी दोघांनीही परदेशात जाण्याआधी विवाह करावा असा आग्रह धरला आणि अमिताभ, जया यांचा मोठ्या धुमधडाक्यात विवाह झाला. (एक्स्प्रेस फोटो)
-
१९९४ साली या दोघांनी ‘अक्का’ या मराठी चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकरली होती. (एक्स्प्रेस वृत्तसेवा)
-
‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ यांना दुखापतीला सामोरे जावे लागले. यावेळी जया बच्चन अमिताभ यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. (एक्स्प्रेस फोटो)
-
१९८१ साली प्रदर्शित झालेला ‘सिलसिला’ चित्रपटाने वाद निर्माण केला. या चित्रपटानंतर अमिताभ आणि रेखा यांच्यात प्रेम संबंध असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये रंगली. मात्र यासर्वांवर मात करत जया आणि अमिताभ यांनी आपले नाते दृढ असल्याचे दाखवून दिले.
-
१९७५ साली अमिताभ आणि जया यांनी शोले चित्रपटासाठी एकत्र काम केले. यानंतर मात्र जया बच्चन यांनी मुलगा अभिषेक आणि श्वेता यांच्या संगोपनासाठी चित्रपटसृष्टीपासून दूर राहणे पसंत केले.
-
‘अभिमान’ चित्रपटातील अमिताभ, जया यांचा लूक. (एक्स्प्रेस फोटो)
अमिताभ आणि जया बच्चन यांचा ४२ वर्षांचा ‘सिलसिला’
बॉलीवूड मेगास्टार अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा आज ४२ वा वाढदिवस. या निमित्ताने बिग बी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवटवरून चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांचे आभार व्यक्त करत पत्नी जयासोबतचे काही दुर्मिळ फोटो शेअर केले आहेत. (एक्स्प्रेस फोटो)
Web Title: Amitabh bachchan celebrates 42 years of togetherness with jaya bachchan