-
महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी सरकारी योजनांच्या घोषणा… अमलबजावणीचा वर्षाव दरवर्षी होत असतो. पण त्यामुळे खरंच महिलांवरील अत्याचार थांबलेत का… की, त्या सक्षम झाल्या आहेत? तर या साऱ्यांची उत्तरं ‘नाही’ अशीच येतील. त्याकरिता नितांत गरज आहे ती महिलांनी स्वतः खंबीरपणे उभं राहण्याची, आपल्यातला आत्मविश्वास जागृत करण्याची. हीच बाब अचूक हेरत निर्मात्या-दिग्दर्शिका सोनाली बंगेरा आजच्या काळाशी सुसंगत विषयावर आधारलेला ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’ हा चित्रपट घेऊन आल्या आहेत.
तीन मैत्रीणींच्या निस्वार्थ मैत्रीची सहज-सुंदर कथा सांगणारा ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’१२ जूनपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. -
आज स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीने काम करत, देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा उचलताना दिसतात. प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या स्त्रियांचं आपलं एक विश्व आहे. प्रत्येकीचा आपला एक मैत्रीणींचा ग्रुप आहे. हाच ग्रुप एकमेकींच्या सुख दुःखात मागे पुढे खंबीरपणे उभा राहून जीवनातील प्रत्येक लढाई समर्थपणे लढण्यास त्यांना पाठबळ देत असतो.‘शुगर सॅाल्ट आणि प्रेम’ हा सिनेमा अशाच तीन मैत्रीणींभोवती सोनाली कुलकर्णी, शिल्पा तुळसकर आणि क्रांती रेडकर यांवर गुंफला आहे.
अजिंक्य देव, समीर धर्माधिकारी, प्रसाद ओक आणि यतीन कार्येकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाद्वारे रसिकांसमोर येत आहे. -
अभिषेक जावकर व गुरुनाथ मिठबावकर प्रस्तुत व आरात्रिका एंटरटेनमेंट प्रा.लि यांच्या संयुक्त विद्यमानेया चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून शब्दबद्ध झालेल्या या गीतरचनांना सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल शृंगारपुरे यायुवा संगीतकार जोडीने संगीत दिलं आहे. -
‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’१२ जूनपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
![chhaava movie sarang sathaye as ganoji shirke and suvrat joshi as kanhoji](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/suvrat.jpg?w=300&h=200&crop=1)
“…अन् तळपायाची आग मस्तकात गेली”, ‘छावा’मध्ये सारंग साठ्ये अन् सुव्रत जोशीने कोणत्या भूमिका साकारल्या आहेत? पाहा झलक