-
गेल्या अनेक वर्षांपासून रमजान ईदला अभिनेता सलमान खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचतोच. यावर्षी ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे.
-
२००९ मध्ये सलमान खानचा अभिनय असलेला ‘वॉंटेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
सन २०१० मध्ये सलमान खानचा ‘दबंग’ हा गाजलेला चित्रपट प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर २१.१० कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने एकूण १५५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
-
‘बजरंगी भाईजान’पूर्वी सलमान खानने ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटातही अभिनेत्री करिना कपूरसोबत काम केले होते. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर मोठा व्यवसाय केला.
-
‘एक था टायगर’ हा सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा अभिनय असलेला चित्रपट २०१२ च्या ईदवेळी प्रदर्शित झाला होता.
-
जॅकलिन फर्नांडिस आणि सलमान खानचा ‘किक’ गेल्यावर्षी २५ जुलैरोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तब्बल २३१.८५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.
-
पुढच्या वर्षी ईदच्याचवेळी सलमान खानचा ‘सुलतान’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
-
फक्त २०१६ नाही तर २०१७ मध्येही ईदच्या काळात सलमान खानचा दंबग-३ प्रदर्शित होण्याची शक्यताही वर्तविण्यात येते आहे.

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका