-
प्रतिष्ठेच्या अशा अॅशेस मालिकेतील दुसऱया कसोटी सामन्यापूर्वी लॉर्ड्सवर इंग्लंडचे खेळाडू नेटमध्ये सराव करताना सचिन तेडुलंकरचा मुलगा अर्जुनने इंग्लंडच्या फलंदाजांसमोर गोलंदाजी केली.
-
इंग्लंडच्या सरावा दरम्यान अर्जुन तेंडुलकरच्या उपस्थितीचे वर्णन तेथील माध्यमांनी ‘अॅशेससाठी इंग्लंडचे छुपे अस्त्र’ असे केले आहे.
-
अर्जुन तेंडुलकर एमसीसीच्या क्रिकेट अकादमीत नियमीतपणे उपस्थित राहत आला आहे. गुरूवापासून सुरू होणाऱया अॅशेस मालिकेतील दुसऱया कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंना फलंदजीचा सराव करता यावा यासाठी निवडण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थी गोलंदाजांच्या चमूत अर्जुन तेंडुलकरचाही समावेश होता.
-
इंग्लंडचे गोलंदाजी प्रशिक्षक गिब्सन यांनी अर्जुनला गोलंदाजीच्या टीप्स देखील दिल्या.
-
इंग्लंडच्या नेट सरावात अर्जुनच्या उपस्थितीची तेथील माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
-
नेटमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांसमोर गोलंदाजी करण्याची संधी मिळाल्याने भरपूर काही शिकता आले, असे अर्जुनने म्हटले.
-
याआधी अर्जुनने अनेकवेळा भारतीय क्रिकेट संघाच्या सराव शिबिरात देखील भारतीय फलंदाजांसमोर गोलंदाजी केली आहे. मात्र, लॉर्ड्सवरील त्याची उपस्थिती अनेकांसाठी आर्श्चयाकारक होती.
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल