-
रुपेरी पडद्यावरील आपल्या अदाकारीने अनेकांची मने जिंकणाऱ्या काजोलचा बॉलिवूड प्रवास लक्षवेधी राहिला आहे. आता दोन मुलांची आई असलेल्या काजोलच्या रुपेरी पडद्यावरील पुनरागमनासाठी तिचे चाहते कमालीचे उत्सुक आहेत. ४१ वर्षीय काजोलने शाहरूख खानबरोबर ‘दुल्हनिया’ चित्रपटासाठीच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. काजोलच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडमधील तिच्या लक्षवेधी प्रवासावर टाकलेला हा प्रकाश झोत…
-
बाजीगर : अब्बास-मस्तान जोडीच्या ‘बाजीगर’ चित्रपटाने खऱ्या अर्थाने काजोलला प्रसिद्धी मिळवून दिली. ‘बाजीगर’मध्ये काजोलने आपल्या बहिणीच्या खून्याच्या प्रेमात पडलेल्या तरुणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा शाहरूख खान आणि काजोलची जोडी रुपेरी पडद्यावर झळकली.
-
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे : १९९५ साली आलेल्या आदित्य चोप्राच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटात ती पुन्हा एकदा शाहरूख खानबरोबर दिसली. काजोलचा हा चित्रपट कमालीचा यशस्वी ठरला. आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन प्रेमात पडणाऱ्या सिमरन नावाच्या तरूण भारतीय मुलीची भूमिका साकारणाऱ्या काजोलला त्या वर्षीचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला.
-
फना : चित्रपटसृष्टीपासून जवळजवळ ६ वर्षे दूर राहिल्यानंतर काजोलने कुणाल कोहलीच्या ‘फना’ चित्रपटाद्वारे जोरदार पुनरागमन केले. यावेळी तिची जोडी होती ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानबरोबर. ‘फना’मध्ये काजोलने दृष्टीहीन काश्मिरी मुलीची भूमिका साकारली होती. जी एका दहशतवाद्याच्या प्रेमात पडते. ‘यश राज’च्या या चित्रपटाला चाहते आणि टीकाकारांकडून चागला प्रतिसाद मिळाला होता. ‘फना’ चित्रपटात भूमिका साकारून काजोलने ‘फिल्मफेअर’चा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आपल्या नावावर केला होता.
-
गुप्त : राजीव राय यांच्या ‘गुप्त’ चित्रपटात तिने नकारार्थी व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटाद्वारे काजोलने आपल्या अभिनयातील वैविध्यता दर्शविण्याचा प्रयत्न केला. नकारार्थी भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा त्या वर्षीचा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार तिने पटकावला. ‘गुप्त’ चित्रपटात काजोलबरोबर बॉबी देओल आणि मनिषा कोईराला यांनीदेखील अभिनय केला होता.
-
इश्क : तिच्या चित्रपट प्रवासातील ‘इश्क’ हा विनोदी चित्रपट तेव्हढाच महत्वाचा आहे. यात तिची जोडी होती अजय देवगणबरोबर. दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या या चित्रपटात आमीर खान आणि जुही चावला यांच्यादेखील प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात काजोलने साकारलेली एक मध्यमवर्गीय तरूणी एका श्रीमंत तरुणाच्या प्रेमात पडल्याचे दर्शविण्यात आले होते. काजोलच्या या चित्रपटानेदेखील चांगली कामगिरी केली होती.
-
कभी खुशी कभी गम : करण जोहरच्या या मल्टिस्टारर चित्रपटात काजोलने महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केले होते. चित्रपटात अमिताभ बच्चन, काजोल, शाहरूख खान, जया बच्चन, हृतिक रोशन, करिना कपूर अशी तगडी स्टारकास्ट होती. ‘कभी खुशी कभी गम’मध्येकाजोलने अंजली शर्मा नावाच्या पंजाबी स्त्रिची व्यक्तिरेखा साकारली होती. यासाठी तिला फिल्मफेअरचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
-
कुछ कुछ होता है : करण जोहरच्या या प्रेमपटात काजोलच्या वाट्याला उत्कृष्ट भूमिका आली. ज्यात तिला आपल्या अभिनयातील वैविध्यता दर्शविण्याची संधी मिळाली. काजोलने या संधीचे सोनो केले. प्रेमाचा त्रिकोण दर्शविण्यात आलेल्या या चित्रपटात काजोल आणि शाहरूख या हिट जोडीने परत एकदा आपली जादू मोठ्या पडद्यावर झळकवली. चित्रपटाच्या पूर्वार्धात काजोलने छोट्या केशरचनेतील उनाड कॉलेज तरुणीची भूमिका साकारली. तर उत्तरार्धात ती भारतीय स्त्रिच्या अवतारात दिसली. या चित्रपटाने भव्य यश संपादन केले.
-
-
प्यार किया तो डरना क्या : १९९८ मधे प्रदर्शित झालेल्या सोहेल खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटात तिने सलमान खानबरोबर मोठा पडदा शेअर केला. धर्मेन्द्र, अरबाझ खान आणि किरण कुमार यांचादेखील अभिनय असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.
-
प्यार तो होना ही था : पती अजय दोवगणबरोबरचा १९९८ सालचा अनीस बाझमी यांचा हा चित्रपट ‘फ्रेंच किस’ या हॉलिवूडपटाचा रिमेक होता. या चित्रपटासाठी काजोलची ‘फिल्मफेअर’ पुरस्काराच्या उत्कृष्ट अभिनेत्रीसाठीच्या नामांकनात वर्णी लागली होती.
-

१०० वर्षांनंतर मालव्य आणि भद्रा राजयोगामुळे ‘या’ राशींचे भाग्य चमकणार!अचानक होतो धनलाभ, बुध आणि शुक्राची होईल असीम कृपा