-
कॅन्सरशी झुंझ देत असलेल्या कुंवर सिंह पाटील या ४ वर्षीय चिमुकल्याची पोलीस अधिकारी होण्याची इच्छा भोईवाडा पोलिसांनी सोमवारी पूर्ण केली. (पीटीआय)
-
चिमुकला कुंवर पोलिसांच्या गणवेशात तेही पोलिसांच्या गाडीतूनच पोलीस ठाण्यात दाखल झाला. (लोकसत्ता फोटो)
-
पोलीस ठाण्यात प्रवेश करताच त्याच्या चेहऱयावरचा आनंद पाहून उपस्थित पोलिसांनाही भरून आले. (लोकसत्ता फोटो)
-
कुंवर पोलीस अधिक्षकांच्या खुर्चीवर अगदी पोलीसी आवेशात विराजमान झाला. कुंवर आपल्यासोबत त्याची खास आवडती बंदुक देखील घेऊन आला होता. (लोकसत्ता फोटो)
-
उपस्थित पोलीस अधिकाऱयांनी या चिमुकल्या पोलीस अधिक्षकाला सलूट देखील ठोकला. हे पाहून कुंवरला देखील आनंद झाला. (लोकसत्ता फोटो)
-
कुंवरची इच्छा पूर्ण केल्याबद्दल त्याच्या पालकांनी भोईवाडा पोलिसांचे आभार व्यक्त केले.(लोकसत्ता फोटो)
-
घरी परत जाताना कुंवर उपस्थित पोलिसांना सलूट करून निघाला. (लोकसत्ता फोटो)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल