-
आम आदमी पक्षाच्या छात्र युवा संघर्ष समितीने संगीतकार, गायक आणि आम आदमी पक्षाचा सदस्य असलेल्या विशाल दादलानी याच्या ‘रॉक शो’चे आयोजन केले होते. या ‘रॉक शो’ला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल देखील उपस्थित होते. (छाया- प्रेमनाथ पांडे)
-
विशाल दादलानीने आपल्या गाण्यांनी या ‘रॉक शो’ला रंगत आणली आणि उपस्थितांना थिरकण्यास भाग पाडले. (छाया- प्रेमनाथ पांडे)
-
येत्या ११ सप्टेंबर रोजी दिल्ली विद्यापीठात निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘आम आदमी’कडून या ‘रॉक शो’चे आयोजन करण्यात आले होते. (छाया- प्रेमनाथ पांडे)
-
विशालसोबत गायिका शिल्पा रावनेही आपल्या गाण्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. (छाया- प्रेमनाथ पांडे)
-
केजरीवाल यांनी या ‘रॉक शो’ दरम्यान विद्यार्थ्यांना संबोधित केले. भ्रष्टाचारला ‘झाडू’न टाकण्याच्या उद्देशाने दिल्लीकरांनी ज्याप्रमाणे विधानसभेत ‘आप’वर विश्वास दाखवला त्याप्रमाणे विद्यापीठातील निवडणुकीतही तरुणाईने विश्वास दाखवावा, असे आवाहन केजरीवालांनी यावेळी केले. (छाया- प्रेमनाथ पांडे)
-
केजरीवालांसोबत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया देखील उपस्थित होते. (छाया- प्रेमनाथ पांडे)
-
सादरीकरण करताना गायिका शिल्पा राव. (छाया- प्रेमनाथ पांडे)
-
विशाल दादलानी, शिल्पा राव यांच्यासह ‘एम टीव्ही रोडिज’ फेम रघुराम देखील या ‘रॉक कॉन्सर्ट’ला उपस्थित होते. (छाया- प्रेमनाथ पांडे)

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral