-
देशातील ऐतिहासिक सत्तांतरानंतर पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी यांचे नाव चर्चेत राहणे साहजिकच होते. यंदाच्या वर्षात मोदींचे परदेश दौरे सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले.
-
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटांप्रकरणी न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आल्यानंतर याकुब मेमनला फाशी देण्यात आली. मात्र, यादरम्यानच्या घटनाक्रमामुळे याकुब मेमन हे नाव प्रचंड चर्चेत होेत.
-
अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन खटल्याच्या सुनावणीकडे यंदाच्या वर्षात संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.
-
यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. त्यानंतर धोनीने काही दिवसांतच निवृत्तीचा निर्णयही जाहीर केला.
-
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार निवडणुकीच्या केंद्रस्थानी नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी हे दोन चेहरे होते.
-
भाजपचा चौखूर उधळलेला विजयाचा वारू अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत रोखला. या निवडणुकीत भाजपला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.
-
देशात असहिष्णुता असल्यामुळे देश सोडून जावेसे वाटते,या विधानामुळे अभिनेता आमिर खान टीकेच्या भोवऱ्यात सापडला होता.
-
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर काही दिवसांचा अज्ञातवास आणि त्यानंतरची संसदेतील भाषणे यांमुळे राहुल गांंधी यंदा चर्चेत राहिले.
-
यंदाच्या वर्षात मार्टिना हिंगिसच्या साथीने सानिया मिर्झाने विम्बल्डन, अमेरिकन ओपन यांसारख्या अनेक मानाच्या स्पर्धा जिंकल्या.
-
गुजतरातमधील पाटीदार समाजाच्या आरक्षण आंदोलनाचे नेतृत्त्व करणारा हार्दिक पटेल यंदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला.
-
देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला तरूण, सुशिक्षित आणि सुसंस्कृत चेहरा लाभला. राज्यातील गोमांस बंदीच्या कायद्यामुळे फडणवीस सरकार यंदा चर्चेत राहिले.
-
ललित मोदी यांचे भाजप नेत्या सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्याशी असणारे लागेबांधे उघड झाल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला होता.
-
बेहिशोबी मालमत्ताप्रकरणाच्या आरोपांमधून झालेली सुटका ते काही दिवसांपूर्वी चेन्नईत निर्माण झालेली पूर परिस्थिती या कारणांमुळे जयललिता यंदाच्या वर्षात चर्चेत राहिल्या.
-
बिहार निवडणुकीच्या काळात सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणासंदर्भात केलेल वक्तव्य बरेच गाजले.
-
गेली दहा वर्षे मध्य प्रदेशात भाजपची सत्ता अबाधित राखणाऱ्या मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना यंदा व्यापम घोटाळ्याच्या मुद्द्यावरून बऱ्याच अडचणींना तोडं द्यावे लागले.
-
सरत्या वर्षात अनेक आघाड्यांवर काँग्रेसला आलेले अपयश आणि नॅशनल हेराल्ड प्रकरणामुळे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे नाव यंदा चर्चेत राहिले.
-
जावई गुरूनाथ मय्यपन याचा स्पॉट फिक्सिंगमध्ये असणारा सहभाग उघड झाल्यानंतर एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते.
-
'दिल धडकने दो', 'बाजीराव मस्तानी' या बॉलीवूडपटांबरोबर 'क्वांटिको' या आंतरराष्ट्रीय मालिकेतील अभिनेत्री प्रियांका चोप्राचे नाव चर्चेत होते.
-
परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांची यंदाची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. मात्र, ललित मोदी प्रकरणामुळे त्यांच्या कामगिरीला काही प्रमाणात गालबोट लागले.
-
कट्टर हिंदुत्त्ववादी खासदार साक्षी महाराज यंदाच्या वर्षात अनेक वादग्रस्त विधानांमुळे चर्चेचा विषय होते.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”