-
अनेक अजरामर कवितांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ कविवर्य मंगेश केशव पाडगावकर यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. (छाया- दिलीप कागडा)
-
पाडगावकर यांच्या पार्थिवावर शीव येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. (छाया- दिलीप कागडा)
-
अनेक अजरामर कवितांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ कविवर्य मंगेश केशव पाडगावकर यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. (छाया- दिलीप कागडा)
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगेश पाडगावकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करताना. (छाया- दिलीप कागडा)
-
२००८ मध्ये पाडगावकर यांना राज्यातील प्रतिष्ठेचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (छाया- दिलीप कागडा)
-
अनेक अजरामर कवितांनी आणि अविट गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. (एक्स्प्रेस छायाचित्र)
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याला १० मार्च १९२९ रोजी रोजी पाडगावकरांचा जन्म झाला. वयाच्या १४ व्या वर्षापासूनच त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. मुंबई विद्यापीठातून त्यांनी मराठी आणि संस्कृतमधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर काही वर्षे ते रुईया महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करीत होते. (एक्स्प्रेस छायाचित्र)
-
कवी वसंत बापट, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि कविवर्य मंगेश पाडगावकर) (एक्स्प्रेस छायाचित्र)
-
'हा चंद्र जागलेला' चित्रपटाच्या संगीत प्रकाशनाच्यावेळी गायक सुरेश वाडकर, अनुपमा देशपांडे, कविता कृष्णमुर्ती, चंपक जैन, श्रीनिवास खळे, सुनिल, संगीत दिग्दर्शक शशांक कट्ट आणि गीतकार मंगेश पाडगावकर. (एक्स्प्रेस छायाचित्र)
-
उतार वयातही त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून आपल्या कविता सादर करून रसिकांचे मन जिंकले. (छाया- दिलीप कागडा)
-
कुमार साहित्य मेळाव्यामध्ये वि.दा.करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर. (छाया-मोहन बने)
-
कविवर्य मंगेश पाडगावकर यांना विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि आर.आर.पाटील यांच्या उपस्थितीत 'महाराष्ट्र भूषण' प्रदान करण्यात आला होता. (एक्स्प्रेस छायाचित्र)
दोस्ताना जमवावा, हास्यिवनेाद आणि काव्यानंदात दोन घटका मजेत घालवाव्यात असा त्यांचा स्वभाव. त्यांचे मेाठेपण हे की ते तसेच जगले. कोणताही आव आणला नाही. आपण जसे आणि जितके आहोत तसेच आणि तितकेच ते समेार येत राहिले. -
शिवाजी मंदिर येथील एका कार्यक्रमात मनोहर जोशी यांचा सत्कार करताना मंगेश पाडगावकर. (छाया-दिलीप कागडा)
मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ ही गाणीही खूप गाजली. प्रेम म्हणजे प्रेम असंत, तुमचं आमचं अगदी ‘सेम’ असतं, ही त्यांची कविताही विशेष गाजली होती. (एक्स्प्रेस छायाचित्र) -
मंगेश पाडगावकरांच्या जाण्याने मराठी साहित्य वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. पाडगावकरांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ ते कविता लिहित होते. (छाया-रमेश नायर)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित