-
आमिर खानच्या पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून मागील तीन वर्षांत राज्यातील विविध जिल्ह्यांत श्रमदान करून पाणी समस्या सोडवण्यात चांगलंच यश मिळालं आहे. या श्रमदानात सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच सहभाग घेतला. अभिनेत्री सई ताम्हणकरसुद्धा गेल्या तीन वर्षांपासून पानी फाऊंडेशनशी जोडली गेली आहे.
-
दरवर्षीप्रमाणे सईने यावर्षीसुद्धा श्रमदानात सहभाग घेतला.
-
महाराष्ट्रातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सईने पुण्याजवळच्या सुकलवाडी इथं श्रमदान केलं.
-
'श्रमदानात सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहून मला खूप आनंद होत आहे. यावर्षी मी ७ वर्षांच्या लहान मुलापासून ते ७० वर्षांच्या वृद्धांपर्यंत अनेकांना श्रमदान करताना पाहिलं आहे', असं सई म्हणाली.
-
धगधगत्या उन्हात जेव्हा हातात कुऱ्हाड घेऊन तुम्ही श्रमदान करता, तेव्हा तुम्ही गाळलेलं घाम मातीत मिसळल्यानंतर, मातीचा जो अद्भुत सुगंध येतो, त्याची तुलना कोणत्याच महागड्या परफ्युमशी करता येत नाही, अशा शब्दांत सईने श्रमदानाचं महत्त्व सांगितलं.
-
अभिनय नव्हे तर पानी फाऊंडेशन हीच माझी सध्या प्राथमिकता आहे असंही सई म्हणते.
Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?