-
ढोल ताशांचा गजर, वैदिक मंत्रोच्चार आणि शंखनादाच्या गजरात रायगड किल्ल्यावर ३४५ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यभरातील हजारो शिवप्रेमी गडावर दाखल झाले होते. (प्रतिनिधी: हर्षद कशाळकर)
-
सकाळी साडे नऊच्या सुमारास छत्रपती संभाजी राजे यांचे राजसदरेवर आगमन झाले. यानंतर मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या सिहासनारूढ पुतळ्याला सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला. नंतर शिवाजी महाराजांच्या पालखीतील मुर्तीला पंचामृत, सप्तगंगा स्नान घालण्यात आले. नंतर या मुर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले.
-
या वेळी संभाजीराजेंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. लवकरच रायगडाच्या तळाशी नवीन रायगड उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
-
या चैतन्यमय सोहळ्या हजारो शिवभक्त नागरिक , महिला पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”