-
प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ खासदार म्हणून निवडून आल्यापासून त्यांच्या संसदेतल्या वावरावर सर्वांचं लक्ष आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात नुसरत यांनी उद्योगपती निखिल जैन यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आता त्या हनिमूनला गेल्या आहेत.
-
नुसरत सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. त्यांनी इन्स्टाग्रामवर सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
निळ्याशार समुद्रकिनारी निसर्गाच्या सानिध्यात नुसरत यांचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री व खासदार मिमी चक्रवर्ती आणि नुसरत एकमेकींच्या खास मैत्रिणीसुद्धा आहेत. नुसरत या फोटोंवर मिमीने प्रतिक्रिया दिली आहे.
-
सोशल मीडियाने सर्वांत सुंदर खासदार असा किताब दिलेल्या नुसरत यांनी टर्कीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं. खासदार झाल्यानंतर नुसरत यांनी लग्नाची घोषणा केली होती. लग्नासाठी त्यांनी शपथविधी सोहळा चुकवला होता.
-
नुसरत व निखिल यांची भेट गतवर्षी दुर्गा पूजेदरम्यान झाली. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

झटका मटणासाठी नितेश राणेंनी आणलं मल्हार प्रमाणपत्र; म्हणाले, “सर्टिफिकेट नसेल तर हिंदूंनी…”